Koyana : श्रीनिवास पाटलांच्या प्रयत्नांना यश; शिवसागर जलाशयात वॉटर ॲम्ब्युलन्स

जावळी तालुक्यातील Jaoli बामणोली Bamnoli परिसरासाठी दुसरी वॉटर ॲम्ब्युलन्स Water Ambulance मंजूर होण्याकरिता प्रशासनाकडून सुधारित प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
MP Srinivas Patil
MP Srinivas Patilsarkarnama

कऱ्हाड : कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात वसलेल्या गावांना आरोग्य सेवा पुरवण्याकरिता वॉटर ॲम्ब्युलन्सला मंजूरी मिळाली आहे. खासदार श्रीनिवास पाटील यांच्याकडून सातत्याने सुरू असलेल्‍या प्रयत्नाला अखेर यश आले आहे. त्यासाठी सुमारे 94 लाखाचा निधी उपलब्ध होणार आहे. ती वॉटर ॲम्ब्युलन्स महाबळेश्‍वर तालुक्यातील तापोळा परिसरात कार्यरत होणार आहे.

जिल्ह्यातील पाटण, जावळी, महाबळेश्वर तालुक्यातील कोयनेच्या शिवसागर जलाशयामध्ये बसलेल्या गावांना आरोग्याची उत्तम सोय मिळावी यासाठी मागील काही वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. दुर्गम भागातील लोकांच्या आरोग्यविषयक समस्या सुटाव्यात यासाठी खासदार श्रीनिवास पाटील यांनी यापूर्वी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री व राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त यांच्याकडे दूरध्वनीद्वारे व लेखी पाठपुरावा केला होता.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात वॉटर ॲम्ब्युलन्स खरेदी करण्यासाठी व इतर आरोग्यविषयक सुविधांसाठी निधी मंजूर होत असल्याचे खासदार पाटील यांना काही दिवसांपूर्वी पत्राद्वारे कळवले होते. त्या अनुषंगाने राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत एक वॉटर ॲम्ब्युलन्स करिता मंजुरी मिळाली आहे. त्या वॉटर ॲम्ब्युलन्सचा वापर तापोळा परिसरात होणार आहे.

MP Srinivas Patil
NCP : निवडणुकींत ‘राष्ट्रवादी पुन्हा’ हेच गाणं वाजलं पाहिजे... श्रीनिवास पाटील

जावळी तालुक्यातील बामणोली परिसरासाठी दुसरी वॉटर ॲम्ब्युलन्स मंजूर होण्याकरिता प्रशासनाकडून सुधारित प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. कोयना धरणाच्या बॅक वॉटरच्या पश्चिमेस अतिशय दुर्गम डोंगराळ भागांमध्ये २४५ हून ज्यादा गावे स्थित आहेत. या ठिकाणी जलद दळणवळणाची साधने उपलब्ध नाहीत. धरण पाणी पातळीत वाढ झाल्यास त्यातून निर्माण होणाऱ्या अडचणींना सामोरे जावे लागते.

MP Srinivas Patil
Wai : प्रतापगड उत्सव समितीच्या २५ वर्षांच्या लढ्याला यश; पेढे वाटून आनंदोत्सव...

ह्या ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून दुर्गम आणि डोंगरी भागात वास्तव्यास असलेल्या नागरिकांना आरोग्यविषयक अडचणीच्या काळात इतर ठिकाणी जाण्यासाठी व आरोग्य सुविधा मिळण्यासाठी महत्वपूर्ण मदत होणार आहे. तसेच ॲम्ब्युलन्ससह देखभाल दुरुस्ती, कर्मचारी वेतन याची देखील तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

MP Srinivas Patil
Satara : कास पठारावर धावणार ई-बस; मंत्री मंगल प्रभात लोढा यांची संकल्पना

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com