इस्लामपूरच्या नामांतराचा विषय चर्चेत : जयंत पाटील काही बोलेनात!

शिवसेनेसह (Shivsena) काही हिंदूत्त्ववादी संघटनांनी इस्लामपूरच्या (Islampur) नामांतराची मागणी केली आहे. पण एमआयएम ने या मागणीला तीव्र विरोध केला आहे
Islampur/Sangali

Islampur/Sangali

सांगली : देशात आजही काही गावांच्या, शहरांच्या नावात परकीय आक्रमकांच्या खुणा जिवंत आहेत. या खुणा मिटल्या गेल्या पाहिजेत हा धागा पकडत देशातील हिंदुत्ववादी संघटनांकडून या गावांच्या आणि शहरांची नावे बदलण्याची मागणी केली जात आहे. अशातच आता सांगलीतील (Sangali) इस्लामपूर (Islampur) शहराच्या नामांतराची मागणीही जोर धरु लागली आहे. मात्र राज्याचे जलसंपदा मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी अद्याप यावर कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही.

औरंगाबाद (Aurangabad) नामांतरानंतर आता इस्लामपूरचे नामांतर ईश्वरपूर करा, अशी मागणी शिवसेनेने (shivsena) केली आहे. तर भाजप आणि श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानने शिवसेनेच्या या मागणीला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादीने अद्याप यावर कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. एमआयएमने मात्र इस्लामपूरच्या नामांतराला विरोध दर्शवला आहे.

<div class="paragraphs"><p>Islampur/Sangali</p></div>
एसटीत नवीन भरती सुरु केली तर... अजितदादांचा कर्मचाऱ्यांना निर्वाणीचा इशारा

भारतातील मुगल आक्रमकांच्या खुणा मिटल्या गेल्या पाहिजेत, या मागणीसाठी महानगरपालिकेत इस्लामपूरचे ईश्वरपूर असे नामांतर करण्याचा ठराव नगरपालिकेत एकमताने मंजूर करावा. तर राष्ट्रवादी काँग्रेसनेही पक्ष राजकारण बाजूला ठेवून राष्ट्र, संस्कृती स्वाभिमान जपण्यासाठी ईश्वरपूरच्या नामांतराला पाठिंबा द्यावा, अशी मागणी श्री शिवप्रतिष्ठानने केली आहे.

इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 1986 साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एका सभेत इस्लामपूरचे ईश्वरपूर असे नामकरण केले होते. तेव्हापासून विविध हिंदू संघटनांनीही इस्लामपूरचे ईश्वरपूर नामकरणासाठी पाठपुरावा केला होता.  जिल्हा आणि राज्यस्तरावरही नगरपरिषदेमार्फत याची याची शिफारस केली जाणार आहे.

मात्र एमआयएमने इस्लामपूरच्या नामांतरच्या मागणीला विरोध केला आहे. इस्लामपूरच्या नामांतरामागचे कारण आधी स्पष्ट करा, की केवळ इस्लाम शब्दाला विरोध असल्याने नामांतराची मागणी केली जात आहे, हे कळवावे, असे एमआयएचे म्हणणे आहे. तसेच सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी ही या मागणवर आपली भूमिका स्पष्ट करावी, असंही एमआयएमने म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com