सुभेदार होळकरांच्या जन्मगावाचा होणार विकास; सभापती रामराजेंच्या प्रयत्नातून १.६१ कोटींचा निधी

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर Ramraje Naik Nimbalkar यांनी ठोस भूमिका घेवून मुरुम Murum व परिसराच्या विकासाला प्राधान्य दिले असून त्यांच्या प्रयत्नांमुळे इतक्या मोठ्याप्रमाणात निधी Fund उपलब्ध झाला आहे.
Ramraje Naik Nimbalkar
Ramraje Naik Nimbalkarsarkarnama

फलटण शहर : सुभेदार मल्हारराव होळकर यांचे जन्मगाव मुरुम (ता. फलटण) परिसराचा पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी शासन स्तरावरून मान्यता मिळाली आहे. पहिल्या टप्प्यात शासनाने एक कोटी ६१ लाख ३१ हजार रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. विकास कामांसाठीचे आराखड्यांचे अंदाजपत्रकही मंजूर केले आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी ठोस भूमिका घेऊन मुरूमच्या विकासाला प्राधान्य दिले आहे.

आगामी काळात येथे मुरूम येथे श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांचे भव्य स्मारक उभारुन या शूर वीर लढवय्या पुरुषाची माहिती, त्यांचे पराक्रम, त्यांनी लढलेल्या विविध लढाया व त्यामधील विजयश्री या स्मारकाच्या माध्यमातून तरुण पिढीसमोर ठेवण्याचा प्रयत्न या माध्यमातून होर आहे. त्यासाठी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी ठोस भूमिका घेवून मुरुम व परिसराच्या विकासाला प्राधान्य दिले असून त्यांच्या प्रयत्नांमुळे इतक्या मोठ्याप्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे.

Ramraje Naik Nimbalkar
'शरद पवार फेलोशीप' जाहीर ; कृषी-साहित्य क्षेत्रांतील ९० जण ठरले मानकरी

मुरुम परिसर पर्यटन स्थळ म्हणून विकसित करताना येथे भक्त निवास, सभा मंडप, नीरानदी घाट आदी कामांचे नियोजन करुन आराखडा तयार केला आहे. त्याचे अंदाज पत्रकानुसार एक कोटी ६१ लाख ३१ हजार रुपये मंजूर झाले आहेत. त्यापैकी ७० लाख रुपये गत वर्षी उपलब्ध करण्यात आले आहेत. उर्वरित ९१ लाख ३१ हजार रुपये आता उपलब्ध करुन दिले आहेत. त्यामुळे आराखड्यातील उर्वरित कामे गतीने पूर्ण करून घेण्याच्या सूचना सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी संबंधीत यंत्रणांना दिल्या आहेत.

Ramraje Naik Nimbalkar
लस नाही, तर पर्यटन नाही; किमान एक डोस आवश्यकच

या अंदाज पत्रक आराखड्यानुसार मुरुम येथे भक्त निवास बांधणे ५० लाख ३४ हजार रुपये, सभामंडप बांधणे २८ लाख ३९ हजार रुपये, शौचालय बांधणे ८ लाख ३८ हजार रुपये, रस्त्याकडेला बंदिस्त गटार बांधणे १० लाख ३० हजार रुपये, नीरा नदी घाट बांधणे ३० लाख ३० हजार रुपये, मुरुम मधील अंतर्गत रस्ते खडीकरण व डांबरीकरण २९ लाख २८ हजार रुपये आणि गावातपथ दिवे (स्ट्रीट लाईट) बसविणे ४ लाख ३२ हजार रुपये असे एकूण १ कोटी ६१ लाख ३१ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी ७० लाख गतवर्षी उपलब्ध झाल्यानंतर मंजूर कामांना सुरुवात करण्यात आली, यावर्षी ९१ लाख ३१ हजार उपलब्ध झाले आहेत त्यामुळे आराखड्याप्रमाणे उर्वरित कामे लवकर पूर्ण करुन घेण्यासाठी ग्रामस्थ प्रयत्नशील आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com