श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात उपनिरीक्षकास मारहाण : तिघांविरूध्द गुन्हा दाखल

पोलिसाला ठाण्यात मारहाण होण्याची श्रीरामपूर ( Shrirampur ) तालुक्यातील बहुदा पहिलीच घटना आहे.
श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात उपनिरीक्षकास मारहाण : तिघांविरूध्द गुन्हा दाखल
CrimeSarkarnama

महेश माळवे

श्रीरामपूर ( जि. अहमदनगर ) - अपहृत मुलीचा शोध लागल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी पोलिस तपासाबाबत जाब विचारला. यावेळी तपासी अधिकारी उपनिरीक्षक समाधान सुरवाडे व नातेवाईकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. यानंतर या नातेवाईकांनी उपनिरीक्षक सुरवाडे यांना धक्काबुक्की करत जखमी केले. याप्रकरणी तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसाला ठाण्यात मारहाण होण्याची श्रीरामपूर ( Shrirampur ) तालुक्यातील बहुदा पहिलीच घटना आहे. ( Sub-inspector assaulted at Shrirampur city police station: Crime filed against three )

याबाबत अधिक माहिती अशी की, अशोकनगर येथून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याचा गुन्हा 13 फेब्रुवारीला शहर पोलिसांत नोंदविण्यात आला होता. हा तपास सुरवाडे यांच्याकडे होता. या मुलीच्या शोधासाठी सुरवाडे हे पोलिस नाईक किरण पवार, हवालदार तुषार गायकवाड यांच्यासह 10 मे रोजी पुणे येथे गेले होते. ही मुलगी चंदननगर सोडून आरोपीसह शिर्डी येथे गेल्याची माहिती 12 मे रोजी त्यांना मिळाली. त्यानुसार शिर्डीचे सहायक निरीक्षक संभाजी पाटील यांनी या अपहृत मुलीचा शिर्डी परिसरात शोध घेतला.

Crime
रामजन्मोत्सवापूर्वीच श्रीरामपूर तालुका हादरला : माथेफिरू पतीने कुटुंब संपविले

मुलगी साईबाबा मंदिराच्या गेट क्रमांक 4 जवळ तिच्या वडिलांना मिळून आली. तिला श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आणले. यावेळी अपहृत मुलीसोबतचा आरोपी हा तिला सोडून पळून गेला असल्याचे तिच्या वडीलांनी सांगितले. आज (ता. 12) दुपारी 12 वाजेच्या सुमारास सदर गुन्ह्यातील अपहृत मुलीचा जबाब नोंदवित असताना विद्युत पुरवठा खंडित झाला. यावेळी पीडितेचा नातेवाईक कक्षामध्ये आले. यातील एकाने मुलीचे वैद्यकीय तपासणी तुम्ही का करत नाहीत, असा जाब विचारला. यानंतर नातेवाईक व सुरवाडे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.

Crime
छत्रपती संभाजीराजेंना शरद पवारांचा मानाचा मुजरा

तिघा नातेवाईकांनी मिळून सुरवाडे यांना मारहाण करत जखमी केले. यावेळी पोलीस ठाण्यात व कक्षामधील नेमणुकीस असलेले अंमलदार सोमनाथ गाडेकर, पोलिस शिपाई भारत तमनर, महिला पोलिस शिपाई योगिता निकम, सरग, ठाणे अंमलदार आलम पटेल, हवालदार पोपट भोईटे, नागरीक सुनील मुथा व सुभाष जंगले यांनी मध्यस्थी करत सुरवाडे यांची सुटका केली. यात गाडेकर यांनाही धक्काबुक्की केली. त्यांच्या हातास देखील दुखापत झाली आहे.

याप्रकरणी सुरवाडे यांनी दिलेल्या फियार्दीवरून तिघांविरूध्द सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीनही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.