नगर अग्निकांड : चौकशीचा केवळ फार्स नको; दोषींवर कारवाई व्हावी : राधाकृष्ण विखे

रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीत असेच निरापराध नागरीकांचे प्राण गेले. पण सरकार यातून शहाणपण शिकले नाही.
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe PatilSarkarnama

नगर : नगर येथील शासकीय रुग्णालयातील आयसीयू विभागाला लागलेल्या आगीची घटना अंत्यत दुर्दैवी आहे. निरापराध नागरिकांचा बळी जाण्यास रूग्णालय प्रशासनाचा हलगर्जीपणाच कारणीभूत आहे. या आगीच्या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असले तरी चौकशीचा केवळ फार्स न करता यातील सत्यता समोर आणण्याची अपेक्षा भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील व्यक्त केली. (Strict action should be taken against culprits in the fire incident in Nagar : Radhakrishna Vikhe Patil)

यापूर्वी राज्यात नाशिक, भंडारा आणि मुंब्रा येथील रुग्णालयात झालेल्या घटनांचा अनुभव राज्य सरकारसमोर होता. रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीत असेच निरापराध नागरीकांचे प्राण गेले. पण सरकार यातून शहाणपण शिकले नाही. या घटनांच्या चौकशीच्या अहवालाचे काय झाले, असा प्रश्न करून नगरच्या रूग्णालयात झालेल्या घटनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असतील तर तो केवळ फार्स ठरु नये. घटनेस जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

Radhakrishna Vikhe Patil
वानखेडेंकडून तपास काढून घेतला आणि २४ तासांच्या आत ‘एनसीबी’चे पथक मुंबईत दाखल!

शासकीय रूग्णालयातील अतिदक्षता विभागाची उभारणी दीड वर्षांपूर्वी करण्यात आली. पण, तिथल्या वातानुकुलित व्यवस्थेची पूर्तता झालेली होती काॽ असा प्रश्न समोर आला आहे. फायर ऑडीट झाले होते की नव्हते, याबाबत प्रशासकीय स्तरावर गोंधळाचे वातावरण आहे. त्यामुळेच इथल्या व्यवस्था तसेच आवश्यक उपाय योजनांबाबत मंत्रीच अनभिज्ञ होते. त्यामुळेच उपचारांसाठी दाखल झालेल्या दहा निरापराध ज्येष्ठ नागरीकांच्या मृत्यूस प्रशासनाचा हलगर्जीपणाच कारणीभूत असल्याचा आरोप विखे पाटील यांनी केला.

Radhakrishna Vikhe Patil
शाब्बास अभिजित...! : सांगोला कारखाना सुरू करणाऱ्या पंढरपूरच्या पाटलांचे शरद पवारांकडून कौतुक

या दुर्दैवी घटनेचे कोणतेही राजकारण आम्हाला करायचे नाही. पण, मागील दोन वर्षापासून कोविड परिस्थिती हाताळण्यात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह नगर जिल्ह्यातील तीनही मंत्र्यांना आलेल्या अपयशामुळे जिल्ह्यात निरापराध नागरीकांचे बळी गेले आहेत. योग्य उपाययोजना वेळेत न झाल्याने प्रशासनाची हतबलता समोर आली आहे. मृतांच्या आकडेवारीतही नगर जिल्हा वरच्या स्थानावर दिसला. जिल्ह्याला वाऱ्यावर सोडून दिल्याकडे लक्ष वेधून आमदार विखे पाटील यांनी या दुर्दैवी घटनेची चौकशी करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला असला तरी तो केवळ फार्स न ठरता या घटनेतील सत्यता समोर आणून दोषी व्यक्तीविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in