अफझलखानाच्या कबरीचे उदात्तीकरण थांबवा... हिंदू एकता आंदोलनाचे राज्यपालांना निवेदन

उच्च न्यायालयाच्या High Court आदेशाची अंमलबजावणी व्हावी, असे मत जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर vikram Pawaskar यांनी राज्यपाल Governer यांच्यापुढे व्यक्त केले.
अफझलखानाच्या कबरीचे उदात्तीकरण थांबवा... हिंदू एकता आंदोलनाचे राज्यपालांना निवेदन
Hindu ekta Andolansarkarnama

सातारा ः महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची आज हिंदू एकता आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या नेतृत्वाखाली महाबळेश्वरला 'राजभवन' येथे भेट घेतली. यावेळी प्रतापगडच्या पायथ्याशी असलेल्या अफझलखानाच्या कबरी शेजारील अनाधिकृत बांधकाम तात्काळ हटवावे. तसेच उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कारवाई करण्याची सूचना राज्य सरकारला करावी, अशी मागणी निवेदनाव्दारे केली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सध्या महाबळेश्वर मुक्कामी आहेत. आज त्यांची हिंदू एकता आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांनी विक्रम पावसकर यांच्या नेतृत्वाखाली भेट घेतली. यावेळी हिंदू एकता आंदोलन यांच्यावतीने प्रतापगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या अफजलखानाच्या कबरी शेजारील अनधिकृत बांधकाम तात्काळ हटवावे. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तात्काळ कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र शासनाला आपण सूचना कराव्यात. अन्यथा, हिंदू एकता आंदोलन महाराष्ट्रभर आंदोलन करेल, असे निवेदन दिले.

Hindu ekta Andolan
प्रतापगड किल्ल्याला भेट देऊन राज्यपालांचे छत्रपती शिवाजी महाराजांना मनोभावे अभिवादन

महाराष्ट्रावर चाल करून आलेल्या अफझलखान रुपी राक्षसाचा छत्रपती शिवाजी महाराज यांनी किल्ले प्रतापगडच्या पायथ्याशी कोथळा काढला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भिमरुपी पराक्रमाची नोंद देशाच्या इतिहासात नोंदली गेली आहे. दुर्दैवाने आज त्याच प्रतापगडच्या पायथ्याशी अफजलखानाच्या कबरीचे उदात्तीकरणाचा प्रयत्न काही धर्मांधांकडून केला जात आहे.

Hindu ekta Andolan
जातीय सलोखा, एकता बिघडू देऊ नका!

अशा समाजविघातक प्रवृत्तींना पायबंद करण्यासाठी तसेच त्या ठिकाणी झालेले अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे, अशा सूचना प्रशासनाला आपण कराव्यात. उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी व्हावी, असे मत जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी राज्यपाल यांच्यापुढे व्यक्त केले.

Hindu ekta Andolan
प्रतापगड, अजिंक्यतारा किल्ले राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करा; उदयनराजेंची उपराष्ट्रपतींकडे मागणी

यावेळी हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, उप जिल्हाध्यक्ष रुपेश मुळे, कार्याध्यक्ष राहुल यादव, शहराध्यक्ष प्रकाश जाधव, शानबाग (सर), करवडी उपसरपंच हिंदुराव पिसाळ, पाटण तालुकाध्यक्ष गणेश पाटील, अजय पावसकर, सागर काळे, गणेश माने, महेश डांगे उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.