कुलगुरूंच्या कार्यालयावर विद्यार्थ्यांकडून दगडफेक : महात्मा फुले कृषी विद्यापीठात राडा

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील वसतीगृहात अधिकृत प्रवेश घेणारे विद्यार्थी व इतर विद्यार्थी अशा दोन गटात वाद आहेत.
Mahatma Phule Agricultural University
Mahatma Phule Agricultural UniversitySarkarnama

अहमदनगर - राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील वसतीगृहात अधिकृत प्रवेश घेणारे विद्यार्थी व इतर विद्यार्थी अशा दोन गटात वाद आहेत. या पार्श्वभूमीवर एका गटाकडून पहाटे रविवारी ( ता. 31 ) पहाटे 1 ते 3 या कालावधीत राडा केला. या वेळी संतप्त विद्यार्थ्यांनी कुलगुरूंच्या कार्यालयावरच दगडफेक केली. ( Stone pelting by students on Vice Chancellor's office: Mahatma Phule Agricultural University riots )

राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या संतप्त विद्यार्थ्यांच्या एका गटा कडून कुलगुरू कार्यालयात आसरा घेतलेल्या दुसऱ्या गटावर दगडफेक करण्यात आली विद्यापीठाच्या दोन गटामध्ये रात्री दगडफेक झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.प्रहार संघटनेचे आप्पासाहेब ढुस यांनी या घटनेच्या चौकशीची मागणी केली आहे.

Mahatma Phule Agricultural University
राजकारणविरहीत मोठे काम ! महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन ठरले भारी

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या दोन गटामध्ये रात्री दगडफेक झालेने एकच खळबळ उडाली असून घटनेची अधिक माहिती अशी की, कृषी पदविका अभ्यासक्रम पूर्ण करणेसाठी या विद्यापीठात राज्यभरातून व देशातून ऑनलाईन विद्यार्थ्यांची निवड केली जाते, ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली त्यांना 70 हजार रुपये फी भरावी लागते. या विद्यापीठात एकूण 168 प्रवेश मर्यादा आहे. तथापि या विद्यापीठाच्या हॉस्टेल मध्ये जवळपास 500 विद्यार्थी अनधिकृतपणे वास्तव्य करून राहात असून त्यांना कुठलीही हॉस्टेल किंवा मेस फी नाही. त्यामुळे अधिकृत आणि अनधिकृत विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ कारणावरून रात्री वादाची ठिणगी पडली.

अनधिकृत विद्यार्थ्यांची संख्या अधिकृत विद्यार्थ्यांपेक्ष्या जास्त असल्याने अधिकृत विद्यार्थ्यांनी स्वतःचा जीव वाचविण्यासाठी वसतीगृहापासून जवळच असलेल्या कुलगुरू कार्यालयात धाव घेत आसरा घेतला. या मुलांना मारण्यासाठी अनधिकृत 500 विद्यार्थ्यांच्या गटाने कुलगुरू कार्यालयावर जोरदार दगडफेक करीत हल्ला केला, तथापि या कार्यालयाबाहेर कार्यरत सुरक्षा रक्षकांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.

Mahatma Phule Agricultural University
कृषी विद्यापीठ ! मंत्री तनपुरे यांच्याकडून या कारणासाठी आंदोलकांचे आभार

विद्यार्थ्यांमधील वाद मिटवले

परीक्षांच्या काळात काही बाहेरचे विद्यार्थी येथे अभ्यासाला येतात. विद्यार्थ्यांमध्ये अंतर्गत वाद होते. आता ते वाद मिटविले गेले आहेत. असे राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलमंत्री महानंद माने, यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in