जयंत पाटलांची मोठी घोषणा : राज्यातील शेकापचे चिटणीस मंडळ बरखास्त

भाजपबरोबर युती होणार नसून समविचारी पक्षासोबत आघाडीबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल
Jayant patil
Jayant patilSarkarnama

सांगोला (जि. सोलापूर) : राज्यात महाविकास आघाडी सरकारला शेतकरी कामगार पक्षाचा पाठिंबा असला तरी सांगोल्यात महाविकास आघाडी होण्यासारखी परिस्थिती नाही. त्यामुळे या ठिकाणी महाविकास आघाडी होणार नाही. राज्यातील शेकाप पक्षाचे चिटणीस मंडळ बरखास्त करण्यात आले असून नवे चिटणीस मंडळ एका महिन्यात स्थापन करुन यामध्ये तरुणांना संधी देण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. (State PWP's secretary board sacked : MLA Jayant Patil)

सांगोल्यात शेकाप पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी दोन दिवस बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत शेकापचे आमदार जयंत पाटील बोलत होते. आमदार पाटील म्हणाले की, शेतकरी कामगार पक्षाचे राज्यातील जिल्हा, शेकापच्या दोन दिवसीय मध्यवर्ती समितीच्या बैठकीत सहा ठराव करण्यात आले. यात राज्यातील वीज ग्राहकांना सवलत द्यावी. विनाअनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांची फी सरकारने भरावी, आरक्षण बाबतीत केंद्र व राज्य सरकारने फसवणूक केली असून 50 टक्के आरक्षण जाहीर करावे. महिलांवरील अत्याचाराची गंभीर परिस्थिती असून ते रोखण्यात केंद्र व राज्य सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे संबंधित गुन्हेगारांना अटक करून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा. सांगली, कोल्हापूरसह राज्यातील पूरग्रस्त भागात नुकसान झालेल्या कुटुंबाना मदत देण्याची फक्त घोषणा केली, तातडीने पूरग्रस्तांना मदत द्यावी, राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक थांबली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

Jayant patil
भगिरथ भालके अध्यक्ष असलेल्या विठ्ठल कारखान्यात १७ कोटींचा घोटाळा

राज्यातील सर्व चिटणीस मंडळ बरखास्त केले असून पक्ष निरीक्षक राज्याचा दौरा करणार असून त्यानंतर शेकापच्या नव्या चिटणीस मंडळाची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यात तरुणांना संधी देण्यात येणार आहे. राज्यात महाविकास आघाडीला पाठिंबा असला तरी महाविकास आघाडीचा प्रयोग सांगोल्यात होणार नसल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. पक्षात नाराजी असली तरी ती दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तालुका चिटणीस मंडळात 25 ते 30 सदस्यांची टीम केली जाणार आहे, असे आमदार जयंत पाटील यांनी सांगितले.

Jayant patil
पार्थ पवारांविरोधात मी जनरल डायरसारखा लढलो; पण विधानसभेला माझ्या पाठीशी कोणीही नव्हते

आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याची इच्छा या बैठकीत कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. मात्र, समविचारी पक्षाशी आघाडी करण्याची चर्चा सुरू आहे. सांगोल्यात निवडणुकीसाठी भाजपबरोबर युती होणार नसून समविचारी पक्षासोबत आघाडीबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी माहितीही जयंत पाटील यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com