जे काही करायचं ते रणांगणात! महाडिकांच्या विजयानंतर सतेज पाटलांचं काय ठरलंय?

राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीचा पराभव करत ताकद दाखवून दिली.
जे काही करायचं ते रणांगणात! महाडिकांच्या विजयानंतर सतेज पाटलांचं काय ठरलंय?
Dhananjay Mahadik Latest Marathi News, Satej Patil Latest Marathi News, Kolhapur News Sarkarnama

कोल्हापूर : राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीचा पराभव करत ताकद दाखवून दिली. अत्यंत चुरशीच्या लढतीत धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांचा विजय झाला. या विजयामुळे कोल्हापूरातील राजकारणही ढवळून निघणार आहे. कारण राज्यमंत्री सतेज पाटील आणि महाडिकांमधील राजकीय वैर संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे महाडिकांच्या विजयावर पाटील काय बोलणार याबाबत उत्सुकता होती. पाटील यांनी आपली पहिली प्रतिक्रिया देत जे काही आहे ते रणांगणातच करायची आपली सवय असल्याचं सुचक वक्तव्य त्यांनी केलं. (Satej Patil Latest Marathi News)

पाटील यांनी मंगळवारी महाडिकांच्या विजयासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, राज्यसभेला काही अडचणी येऊन महाविकास आघाडीला थोडं मागं जावं लागलं. या अनुभवातून विधान परिषदेच्या निवडणुकीत आघाडीचे सर्व उमेदवार विजयी होतील. राज्यसभेचा निकाल आल्यामुळे त्यावर बोलणं संयुक्तिक होणार नाही.

Dhananjay Mahadik Latest Marathi News, Satej Patil Latest Marathi News, Kolhapur News
पंतप्रधान कार्यालयानंच नाकारली अजितदादांच्या भाषणाला परवानगी!

आता विधान परिषदेची तयारी सुरू असून यावेळी दगाफटका होणार नाही. देशाते सुडाचे राजकारण सुरू आहे. पुर्वी पाच लोकांनासुध्दा ईडी माहित नव्हती. आता गल्लीत सुध्दा ईडी माहिती झाली आहे. यातून ईडीचा सुडीबुध्दीने किती वापर होत आहे, हे सिध्द झालं आहे. सरकारविरोधात कुणी बोललं की त्याच्यामागे ईडी लावली जाते. यातून आमचे नेते सहीसलामत बाहेर पडतील, अशी टीका पाटील यांनी केली.

जे काही करायचं ते रणांगणात

लोकशाहीमध्ये स्थितंतरे घडत असतात. जे काही घडलं आहे, ते आम्ही स्वीकारतो. पण जनतेतून ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये मागील पाच सहा वर्षांत लोकांचा कल काय आहे, स्पष्ट झालेलं आहे, असं पाटील यांनी स्पष्ट केलं. राज्यसभेच्या निकालानंतर कोल्हापूरात परिवर्तन होईल, असं बोललं जात आहे. त्यावर बोलताना पाटील म्हणाले, रणांगणातच जे काही आहे ते करायचं ही माझी सवय आहे. आता जिल्हा परिषद, महापालिका लांब आहे. ज्यावेळी लढाई असते त्यावेळी आम्ही कसं उतरतो, हे सगळ्यांनी बघितलं आहे, असं प्रत्युत्तर पाटील यांनी दिलं.

Dhananjay Mahadik Latest Marathi News, Satej Patil Latest Marathi News, Kolhapur News
मोदींच्या तिसऱ्या कार्यक्रमात तर अजितदादांना खुर्चीही नाही

दादा हे राज्याचे अध्यक्ष असल्याने बोलतात. परंतु, एक यश मिळाल्याने त्यांना वाटत असेल की सगळं असंच घडणार आहे. पण तसं काही घडणार नाही. यामध्ये काही गोष्टी अनावधानाने घडल्या आहेत. त्याची पुनरावृत्ती विधान परिषदेत होणार नाही. याची खबरदारी घेऊ. त्याचे नियोजन आम्ही करू, डोळे बंद करून बसणार नाही, असं स्पष्ट करत पाटील यांनी विधान परिषदेत आघाडीच्या सर्व उमेदवारांचा विजय होईल असा विश्वास व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in