Eknath Shinde News : कोर्टानं सरकारचा तर सरकारनं 'समृद्धी'चा मार्ग मोकळा केला; मुख्यमंत्री शिंदेचा विरोधकांना टोला

Samruddhi Mahamarg Inauguration : एका शेतकऱ्यासाठी मुख्यमंत्री झाले साक्षीदार
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama

Eknath Shinde and Samruddhi Mahamarg: मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर या दुसऱ्या टप्प्याचे शुक्रवारी (ता. २६) लोकार्पण करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डीत आयोजित सोहळ्यात या महामार्गाचे लोकार्पण करण्यात आले. शिर्डी ते भरवीर पर्यंत असा ८० किलोमीटर अंतराचा हा महामार्ग आहे. (Samruddhi Mahamarg Mumbai Nagpur Expressway)

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांसह ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "समृद्धी महामार्गाचे काम सुरू झाले त्यावेळी माझ्याकडे मंत्री असूनही काही काम नव्हते. त्यावेळचे मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी समृद्धी महामर्गाच्या माध्यमातून खूप काम दिले. त्यावेळी या कामाला विरोध करणारे तयार केले. त्यांचे मला फोन येत होते. मात्र चांगला प्रकल्प असल्याने नंतर विरोध मावळला. मी घरात बसून काम केले नाही. गावागावात जाऊन शेतकऱ्यांना भेटलो. प्रकल्प चांगला असल्याचने ओठात एक आणि पोटात एक असे कृत्य केले नाही."

Eknath Shinde
Samruddhi Highway News : ठाकरे-पवारांनी केला विरोध, पण समृद्धी महामार्ग रेकाॅर्ड वेळेत पूर्ण ; फडणवीसांनी डिवचलं!

समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून कुणाची समृद्धी होणार, असा प्रश्न विरोधक विचारतात. त्यावर या मार्गाच्या माध्यमातून शेकऱ्यांची समृद्धी होणार असल्याचे उत्तर मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, "सुरुवातीला या मार्गसाठी मोठा विरोध झाला. मात्र लोकांना या मार्गाचे महत्व पटवून दिले. त्यानंतर लोक स्वतःच जमीनी देण्यासाठी पुढे आले. आता या मार्गाच्या भूसंपादानातून शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे. त्यातून त्यांनी आपले व्यावसाय सुरू केले. अनेकांनी दुसऱ्या ठिकाणी जमिनी खरेदी केल्या. या महामर्गाला जोडू १३ आंतरराष्ट्रीय प्रकल्प होणार आहेत. शेतकऱ्यांचा माल नागपुरातून मुंबईला एका दिवसात पोहचणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या आयुष्यात बदल घडविणारा ठरला आहे."

Eknath Shinde
Kumar Ketkar on Patole: कामाची वेळ पाळा नाहीतर 2024 मध्ये...; कुमार केतकरांनी टोचले नाना पटोलेंचे कान

... अन् मुख्यमंत्री झाले साक्षीदार

समृद्धी महामार्गाला होणाऱ्या अनेक किस्से मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी कारंजा येथील एक किस्साही सांगितला. ते म्हणाले, "या मार्गाला सुरुवातीस ठिकठिकाणाहून विरोध होत होता. त्यावेळी कारंजा येथे सुरू असलेल्या आंदोलनाला भेट दिली. त्यावेळी शेतकऱ्यांनी यापूर्वीच्या प्रकल्पांबाबत वाईट अनुभव आल्याचे सांगितले. त्यावेळी त्यांना मी तीन-चार तासात तुम्हाला पैसे मिळतील असे आश्वासन दिले. तसेच मुख्यमंत्री असूनही त्यांच्या आरटीजीएसवर साक्षीदार म्हणून सही केली. त्यानंतर तीन तासांनी त्यांच्या खात्यात पैसे जमा झाल्याचा त्यांनी फोन करून सांगितले."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in