`राज्य सरकारचे पॅकेज किती शेतकऱ्यांना मिळणार, हे आधी सांगा!`

भाजपचे ( BJP ) प्रदेश उपाध्यक्ष व माजी मंत्री राम शिंदे ( Ram Shinde ) यांनी राज्य शासनावर टीका केली.
`राज्य सरकारचे पॅकेज किती शेतकऱ्यांना मिळणार, हे आधी सांगा!`
BJP's agitation against the state governmentParesh kapse

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी, पारनेर, शेवगाव, राहुरी आदी तालुक्यांसह अनेक ठिकाणी मागील दीड महिन्यांत अतिवृष्टी झाली होती. जिल्हा प्रशासनाने या अतिवृष्टीचे पंचनामे देखील केले. मात्र शेतकऱ्यांना अजूनही नुकसान भरपाई मिळालेली नाही. यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील अतिवृष्टी झालेल्या भागातील शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून तातडीची आर्थिक मदत मिळण्यासाठी अहमदनगर जिल्हा भारतीय जनता पक्षातर्फे लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे. हे आंदोलन अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील जिल्हा भूजलसर्वेक्षण कार्यालयासमोर सुरू आहे. या प्रसंगी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी मंत्री राम शिंदे यांनी राज्य शासनावर टीका केली. State first how many farmers will get the package announced by the state government for farmers

अहमदनगर जिल्यातील अतिवृष्टी झालेल्या भागातील विशेषतः शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील गावामध्ये मोठ्या प्रमाणत शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. त्याकरीता शेतकऱ्यांना राज्य सरकार कडून तातडीची आर्थिक मदत मिळण्यासाठी आमदार मोनिका राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली लाक्षणिक उपोषणास सुरवात करण्यात आली आहे. यावेळी माजी मंत्री राम शिंदे, खासदार सुजय विखे पाटील, माजी मंत्री शिवाजी कर्डिले, जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, महेंद्र गंधे, दिलीप भालसिंग, तारभाऊ लोंढे, माणिकराव खेडकर, काशिताई गोलहर, धनंजय बडे, व सर्व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

BJP's agitation against the state government
सुजय विखे म्हणाले, अजित पवारांच्या आदेशानेच नगर जिल्ह्यातील गावांत लॉकडाऊन

राम शिंदे म्हणाले, जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. त्यावेळी आम्ही जिल्हा प्रशासनाकडे मागणी केली होती की, संसार उपयोगी वस्तू तातडीची मदत द्या. ही मदत 24 तासात द्यायची असते. दीड महिना झाला तरी आज तागायत नुकसान भरपाई देण्यात आली नाही. नुकसानीचे पंचनामे झाले त्याचीही नुकसान भरपाई नाही. त्याच बरोबर सक्तीची वीज बिल वसुली सुरू आहे. वीज जोडणी तोडत आहे. पुरेशा दाबाने वीज मिळत नाही. शेतीला पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होत नाही.

रस्ताला खड्डे पडले आहेत. राज्यातील कोणतेही खाते रस्त्यावरील खड्डे बुजविताना दिसत नाही. प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनांचे वीज बिल शासनाच्या वतीने भरले पाहिजे. आमच्या सरकारच्या कालखंडात आम्ही तो भरण्याचा प्रयत्न केला. पण हे शासन त्याकडे जाणिव पुर्वक दुर्लक्ष करत आहे. या चार प्रमुख मागण्या घेऊन आम्ही उपोषण करण्याचा इशारा देऊनही जिल्हा प्रशासनाने दखल घेतली नाही म्हणून आम्हाला उपोषणाचे हत्यार उपसावे लागले आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांना त्यांची नुकसान भरपाई मिळत नाही तो पर्यंत आम्ही आंदोलन थांबविणार नाही, असा इशाराही राम शिंदे यांनी दिला

BJP's agitation against the state government
राम शिंदे म्हणाले, त्यांचा महाराष्ट्र बंदचा प्रयोग फसला...

ते पुढे म्हणाले, राज्य सरकारने शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर केले आहे पण कोकण, सांगली अतिवृष्टी झाली. कोल्हापूरला पुराचा फटका बसला. अहमदनगर जिल्हासह राज्यातील इतर जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन दीड महिने झाल्यावर पॅकेज जाहीर केले. या पॅकेजची अंमलबजावणी केव्हा होणार. हे अधिकृतरित्या कोणीतरी आम्हाला सांगितले पाहिजे. उपोषण करणे हाच एकमेव पर्याय नाही. राज्य सरकार व प्रशासन शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे जाणिवपुर्वक दुर्लक्ष्य करत आहे. त्यामुळे आम्ही उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्य सरकारने काल जाहीर केलेल्या दहा हजार रुपयांच्या पॅकेज हा घाई घाईने घेतलेला निर्णय आहे. त्यामुळे काहीच होणार नाही. हे पॅकेज जिल्ह्यातील किती लोकांना प्राप्त होणार हे सांगण्याची अवश्यकता आहे, असे राम शिंदे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in