एसटी कर्मचाऱ्यांचा कऱ्हाडला बायकापोरांसह मोर्चा

एसटी कर्मचाऱ्यांनी ST workers कोणत्याही परिस्थितीमध्ये Agitiation आंदोलन मागे घेणार नाही असा निर्धार केला. दरम्यान आज आंदोलनास विविध संघटनांनी पाठिंबा दिल्याचे सांगण्यात आले.
ST workers Agitiation
ST workers Agitiationkarad Reporter

कऱ्हाड : एसटी आमच्या घामाची, नाही कुणाच्या बापाची..., कोण म्हणतो देत न्हाय, घेतल्याशिवाय रहात नाय..., एसटीचे राज्य शासनात विलगीकरणीकरण झालेच पाहिजे..., अशी घोषणाबाजी करत एसटी कर्मचाऱ्यांनी आज कराडात बायकापोरांसह तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी तहसिलदारांना शिष्टमंडळाच्यावतीने निवेदन देण्यात आले.

यावेळी निर्णय झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी केली. एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलगीकरण व्हावे या मागणीसाठी आरपारची लढाई पुकारली आहे. त्याअंतर्गत एसटी आगारासमोर कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु असुन बस स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळच एसटी कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर ठिय्या मारला आहे. बंदला १०० टक्के प्रतिसाद मिळाला आहे. सध्या बसेस बंद आहेत.

ST workers Agitiation
अण्णा हजारेंनी आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना दिला हा कानमंत्र...

दरम्यान, आज एसटीच्या कर्मचाऱ्यांनी बायकापोरांसह तहसीलदार कार्यालयावर मोर्चा नेण्याचे आयोजन केले होते. मोर्चा सुरु झाल्यानंतर कर्मचारी दत्त चौकात पोचल्यावर पोलिसांनी तेथे मोर्चा अडवुन केवळ शिष्टमंडळानेच निवेदन देण्यासाठी तहसिलदार कचेरीत जावे, असे आवाहन केले. आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळाने जावुन तहसीलदार विजय पवार यांना निवेदन दिले. त्यानंतर मोर्चा दत्त चौकातुन पुन्हा एसटी बसस्थानकाबाहेर नेण्यात आला. तेथे कर्मचाऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये आंदोलन मागे घेणार नाही असा निर्धार केला. दरम्यान आज आंदोलनास विविध संघटनांनी पाठिंबा दिल्याचे सांगण्यात आले.

ST workers Agitiation
एसटी संप : निलंबित कर्मचाऱ्यांचा आकडा २ हजार पार!

प्रवाशांची पाच दिवसांपासुन पायपीट

एसटीच्या कर्मचाऱ्यांनी सुरु केलेल्या काम बंद आंदोलनाला १०० टक्के प्रतिसाद मिळाला आहे. एकही एसटीबस आगारातुन बाहेर जात नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. प्रवाशांना महामार्गासह अन्य मार्गावर बराचकाळ वाहनांची वाट पहात ताटकळावे लागले. ग्रामीण भागातील अनेक गावातील लोकांना पायपीट करण्याशिवाय पर्यायच उरलेला नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com