गुणरत्न सदावर्ते तुरुंगात; एसटी कर्मचारी कामावर

ST Strike| satara news| High court| उच्च न्यायायालयाच्या निर्णयानंतर कर्मचारी पुन्हा सेवेत रुजू होऊ लागल्याचे दिसत आहे.
ST Strike|
ST Strike|

सातारा : गेल्या पाच-सहा महिन्यांपासून सुरु असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप (St strike) अखेर काही प्रमाणात मिटताना दिसत आहे. उच्च न्यायायालयाच्या (High court) निर्णयानंतर कर्मचारी पुन्हा सेवेत रुजू होऊ लागल्याचे दिसत आहे. साताऱ्यात आतापर्यंत सुमारे 300 हून अधिक कर्मचारी पून्हा कामावर रुजू झाले आहेत. त्यामुळे मागील काही महिन्यांपासून विस्कळीत झालेली एस. टी. सेवा पूर्ववत सुरू होणार आहे.

ST Strike|
इम्रान यांचे अनेक कारनामे समोर ; पंतप्रधान शाहबाज यांच्याकडून अनेक गुपितं उघड

राज्य सरकारने कडक कारवाईचा इशारा देऊनही एस. टी. कर्मचार्‍यांची संप मागे घेण्यास तयार नव्हते. मात्र, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आणि वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक होताच संपकऱ्यांनीही माघार घेण्यास सुरुवात केली आहे. सातार्‍यासह विविध आगारात आता मोठ्या प्रमाणात कर्मचारी पुन्हा कामावर हजर होताना दिसत आहेत. येत्या काही दिवसांत सर्व कर्मचारी कामावर हजर होतील, अशी अपेक्षा एस. टी. महामंडळातील अधिकार्‍यांनी व्यक्‍त केली आहे.

गेल्या आठवडाभरात जिल्ह्यातील आगारांमध्ये 300 हून अधिक चालक, वाहक व यांत्रिकी कर्मचारी सेवेत रुजू झाले आहेत. तसेच, बडतर्फीची कारवाई केलेल्या 100 हून अधिक कर्मचार्‍यांचे अर्जही दाखल करुन घेण्यात आले असून येत्या सोमवारी विभागीय कार्यालयात या अर्जांवर सुनावणी होणार आहे. जिल्ह्यातील सर्व आगारांमध्ये कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होऊ लागल्याने आता लांब पल्ल्याच्या मार्गावर धावणार्‍या एसटी बसेसमध्येही वाढ करता येणाार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील एसटीच्या फेर्‍या पुर्ववत सुरू होऊन ग्रामीण भागातील प्रवाशांसह विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होणार आहे.

दरम्यान, एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करण्यासाठी गेल्या पाच महिन्यांपासून एसटी कर्मचारी संपावर होते. या पाच महिन्यांच्या काळात राज्यातील एसटी वाहतूक सेवा पुर्णपणे कोलमडली होती. राज्य सरकारने या संपावर तोडगा काढण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्याही पूर्ण केल्या मात्र तरीही कर्मचारी संपावर अडून होते. तएसटी कर्मचार्‍यांनी न्यायालयातही याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयानेही कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचे निर्देश दिले. त्यानंतरही झालेल्या अनेक घडामोडीनंतर आणि न्यायालयाच्या आदेशानंतर कर्मचारी कामावर परतू लागले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com