संपाच्या तणावातून एसटी चालकाचा हृदयविकाराने मृत्यू: मेढा आगारात होते कार्यरत

सध्या एसटी कर्मचाऱ्यांचा ST strike विविध मागण्यांसाठी संप सुरू आहे. शासनाकडून यासंपावर अद्याप कोणताही तोडगा काढण्यात आलेला नाही.
संपाच्या तणावातून एसटी चालकाचा हृदयविकाराने मृत्यू: मेढा आगारात होते कार्यरत
ST Strikesarkarnama

सातारा : संपावर तोडगा काढण्यात राज्य सरकार अद्याप यशस्वी झालेले नाही. त्यामुळे एसटी कर्मचारी प्रचंड तणावाखाली असून या तणावातूनच सातारा जिल्ह्यातील मेढा आगारातील एसटी चालकाचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. संतोष वसंत शिदें (रा. आसगाव, ता. सातारा) असे मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे. गेली चार पाच दिवसांपासून ते तणावाखाली होते.

सध्या एसटी कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप सुरू आहे. शासनाकडून यासंपावर अद्याप कोणताही तोडगा काढण्यात आलेला नाही. त्यामुळे सर्वच एसटी कर्मचारी प्रचंड तणावाखाली आहेत. काल साताऱ्यात वाहकाने वाहतूक नियंत्रकाला दगडाने मारहाण केल्याची घटना घडली होती. त्यानंतर आज संपामुळे तणावाखाली आलेल्या चालकाचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे.

ST Strike
एसटी संपास गालबोट; वाहकाने नियंत्रकाच्या डोक्यात घातला दगड

चालक संतोष शिंदे हे गेली चार ते पाच दिवसपासून संपामुळे प्रचंड तणावाखाली होते. काल त्यांना हृदय विकाराचा झटका आला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्च्यात दोन मुले, पत्नी व आई, वडील असा परिवार आहे. आता आणखी किती संतोष जाण्याची राज्य सरकार वाट पाहत आहे, असं प्रश्न सामान्य जनतेला पडला असून एसटी महामंडळ तात्काळ शासनात विलीन करावे, अशी मागणी जोर धरु लागली आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in