Sanjay Raut News : पानगळीशिवाय वसंत फुलत नाही, 2024 ला हिशोब चुकता करणार; राऊतांचा इशारा

Politics : ''सत्य काय आहे हे 2024 मध्येच समजेल...''
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama

Kolhapur : ''पानगळ झाल्याशिवाय वसंत फुलत नाही, पानगळ झाली तरच झाडांना नवीन पालवी येते. आता आपल्याकडे शिवसेना नाव आणि चिन्हही नाही. तरी देखील आपल्याकडे लोक येतील आणि शिवसेनेचं नंदनवन पुन्हा फुलेल''.

''शिवसेनेनी अनेक संघर्ष पाहिलेत. त्यामुळे या संघर्षातून पुन्हा शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात भरारी घेईल. मात्र, 2024 ला आपण सर्वांचा हिशोब चुकता करणार'', असा इशारा संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदेंना दिला.

ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत हे आज कोल्हापूरमध्ये पार पडलेल्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप आणि एकनाथ शिंदे यांत्यावर जोरदार प्रहार केला.

ते म्हणाले, ''खरे शिवसैनिक हे उद्धव ठाकरे यांच्या बरोबर आहेत. शिवसेनेच्या जखमी वाघाला डीवचू नका, अन्यथा परिणाम भोगावे लागतील. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर राज्यात आक्रोश होत आहे. पण आमचा सर्वोच्च न्यायालयावर विश्वास आहे'', असं राऊत म्हणाले.

Sanjay Raut
Maharashtra News : संकटात सापडलेल्या संजय राऊतांच्या मदतीला धावून आले अनिल परब; म्हणाले...

''सत्य काय आहे हे 2024 मध्ये समजेल. सरकारमध्ये हिंमत असेल तर गौतम अदानींना नोटीस पाठवावी. पण यांच्यात हिंमत आहे का? कारण अदानी हे मोदींचे मित्र आहेत. त्यामुळे हे त्यांच्यावर कारवाई करू शकत नाहीत. काहीजण पळून गेले''.

''पण आम्ही घाबारणाऱ्यातले नाहीत. त्यामुळे 40 गद्दार पळून गेले त्यांनी आम्हाला शिकवू नये. ते भाजपची गुलामी करत आहेत. बाळासाहेबांनी आम्हाला कुणाची गुलामी शिकवली नाही'', असं म्हणत त्यांनी शिंदेंना टोला लगावला.

Sanjay Raut
Sanjay Raut : "खरे शिवसैनिक असाल तर..."; शिवसेनेच्या आमदारांचं राऊतांना खुलं आव्हान

''2024 ला महाराष्ट्रासह दिल्लीही आमच्या ताब्यात असेल. त्यामुळे तुम्हाला सत्य काय आहे हे 2024 मध्येच समजेल. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना टक्कर देणारा एकच नेता आहे. ते म्हणजे उद्धव ठाकरे''.

''सध्या आपल्याकडे नाव आणि पक्ष देखील नाही. पण तरी देखील आत्ता निवडणुका घ्या. एकटी शिवसेना 50 जागा घेऊल येईल, आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होतील'', असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com