ईडी पान-तंबाखूचं दुकान झालंय...भाजपविरोधात बोलल्याने उद्या माझ्याही घरी ईडी येऊ शकते

ईडीच्या छापेमारीचा प्रणिती शिंदे यांनी खरपूस शब्दांत घेतला समाचार
Praniti Shinde
Praniti ShindeSarkarnama

सोलापूर : सक्तवसुली संचनालय (ईडी) म्हणजे पान-तंबाखूचे दुकान झाले आहे. कोणाच्याही घरात घुसते आणि कोणालाही उचलून घेऊन जाते. जे त्यांच्या (भारतीय जनता पक्षाच्या) विरोधात बोलतात, ईडी त्यांच्या घरात घुसते. मी त्यांच्या विरोधात बोलतेय, त्यामुळे माझ्या घरातही उद्या ईडी येऊ शकते, अशी भीती काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्याध्यक्ष तथा सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली. (Speaking against BJP, ED may come to my house tomorrow : MLA Praniti Shinde)

सोलापुरात रविवारी (ता. २४ ऑक्टोबर) एका खासगी कार्यक्रमात आमदार प्रणिती शिंदे बोलत होत्या. त्यावेळी त्यांनी भारती जतना पक्ष, वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम या तीनही पक्षांचा खरपूस शब्दांत समाचार घेतला. तसेच, राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांवर ईडी आणि प्राप्तीकर विभागाकडून पडत असलेल्या छाप्याबाबतही भाष्य केले. भाजपच्या विरोधात बोलणाऱ्या नेत्यांवर ही कारवाई होत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

जे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात बोलतात, त्यांच्या घरावर ईडीकडून छापेमारी होते. पण, जे खरोखरच दोषी आहेत. ज्यांनी दिवसाढवळ्या शेतकऱ्यांना आपल्या वाहनाखाली चिरडलं आहे, ते मात्र मुक्तपणे बाहेर फिरत आहेत आणि जे निर्दोष आहेत, ते मात्र जेलमध्ये अडकले आहेत, असा आरोप आमदार शिंदे यांनी यावेळी बोलताना केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. काँग्रेसच्या काळात जे मनात येईल ते खाण्याच, कपडे घालण्याचं, जिथे पाहिजे तिथं फिरण्याचे स्वतंत्र होते. मात्र, सध्या परिस्थिती पूर्णतः उलट झाली आहे, अशी टीकाही प्रणिती शिंदे यांनी बोलताना केली.

दरम्यान, भाजप, वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम या बिनकामाच्या पार्टी आहेत. यांचे फक्त दोनच उद्देश आहेत, ‘आवो, झगडा लगाओ और चले जावो... बत्ती लगाओ और चले जावो...असंही त्या या वेळी म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com