कॅमेऱ्यासमोर जपून बोला, समाज नाराज होतोय : अजितदादा यांच्या कानपिचक्या

उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि महाविकास आघाडी सरकारची पुढची दिशा स्पष्ट केली.
Ajit pawar
Ajit pawarSarkarnama

कोल्हापूर - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षतर्फे कोल्हापूरमधील तपोवन मैदानात संकल्प सभेचे आज आयोजन करण्यात आले आहे. या सभेला राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते उपस्थित आहेत. संवाद परिवार यात्रेच्या समारोपाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि महाविकास आघाडी सरकारची पुढची दिशा स्पष्ट केली. ( Speak carefully in front of the camera, society is upset: Ajitdada's ear piercing )

अजित पवार म्हणाले, अलिकडच्या काळात राज्यातले वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न काही शक्तींकडून चालू आहे. गुढीपाडव्यानंतर राज्यात जात, धर्म, व्देषाचे बीज पेरण्याचे काम केले जात आहे. सिल्वर ओकवर हल्ला करणे, मातोश्रीवर जाण्याचा प्रयत्न करणे अशा गोष्टी सुरू आहेत. महागाईकडे लक्ष जाऊ नये म्हणून जाणीवपूर्वक समाजाचे लक्ष विचलित केले जात आहे. 'त्यांनी' फेकलेल्या जाळ्यात न अडकता, त्यांच्या अजेंड्याला बळी न पडता विकासाचे राजकारण आपल्याला करायचे आहे, अशी दिशा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केली. तसेच मिडियापुढे बोलताना तारतम्य ठेवले पाहिजे. कॅमेऱ्यासमोर जपून बोला, समाज नाराज होतोय, अशा कानपिचक्याही नेतेमंडळींना दिल्या.

Ajit pawar
अजित पवार की सुप्रिया सुळे?, अदिती तटकरेंचं पाहा उत्तर

दोन लाखांच्या आतील पीककर्जधारकांना कर्जमाफी दिली आहे. लवकरच नियमित कर्जफेड करणारांना 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान खात्यावर जमा करणार आहोत तसेच दोन लाखांच्या वरील कर्जदारांनाही कर्जमाफी योजनेचा लाभ देणार आहोत, असा शब्द अजित पवार यांनी दिला. याशिवाय ऊसतोडणी यंत्र खरेदीसाठी अनुदान सुरू करणे, उशिरा झालेल्या ऊसतोड वाहतुकीस अनुदान देणे व साखऱ उताऱ्यातील घट झाल्याबद्दल अनुदान देणे याबाबतही निर्णय घेऊ असेही त्यांनी स्पष्ट केले.

त्यांनी सांगितले, की दोन समाजात तेढ निर्माण करून महाराष्ट्राला पुढे जाता येणार नाही. शिवाजी महाराजांची तसेच शाहू, फुले, आंबेडकरांची शिकवण घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे. कोरोनाकाळातून सावरत महाविकास आघाडी सरकार चांगले काम करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र गुढीपाडव्याचे नवे वर्ष सुरू झाल्यानंतर काही शक्तींकडून तेढ निर्माण केली जात आहे. पेट्रोल, डिझेल, गॅसच्या किमती वाढल्या. केंद्र सरकाच्या चुकीच्या धोरणामुळे महागाई वाढली. याकडे लक्ष जाऊ नये म्हणून ते समाजाला विचलित करत आहेत. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी याला बळी पडू नये. तसेच कसल्याही अडचणी आल्या तरी खचून जाऊ नये. माध्यमांना प्रतिक्रिया देताना तारतम्य ठेवले पाहिजे. अन्यता सोशल मिडिया नको त्या गोष्टी पसरवत असतो. आपल्या वक्तव्याने कुठला तरी समाज नाराज होतो, असा सल्लाही पवार यांनी दिला.

Ajit pawar
Video: दर आठवड्याला लोडशेडींग बाबत आढावा घेतला जाईल; अजित पवार

निवडणुकांना तयार राहण्याचा आदेश

ओबीसी समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधीत्व मिळाले पाहिजे यासाठी राज्य सरकारने एकमताने ठरव केला. चांगले वकील दिले. यदाकदाचित सर्वोच्च न्यायालयाकडून वेगळा निर्णय आला तरी कार्यकर्त्यांनी गहाळ पडू नये. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करावी लागणार आहे. त्यानंतर निवडणुका लागल्या तर राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता तत्पर असला पाहिजे. पुन्हा निवडणुका लागतील असे वाटले नाही. आम्ही गहाळ होतो. कार्यकर्ता पेटून उठत नाही तोवर जागा वाढणार नाहीत, असे म्हणू नका असे आदेश अजित पवार यांनी देताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याचे सूचित केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com