मातोश्री आमचे मंदिर; तर एकनाथ शिंदे संकटमोचक : क्षीरसागरांनी साधला बॅलन्स!

शिवसेनेचे काही मंत्री काम करत नव्हते.
Uddhav Thackeray-Eknath Shinde-Rajesh Kshirsagar
Uddhav Thackeray-Eknath Shinde-Rajesh KshirsagarSarkarnama

मुंबई : ‘मातोश्री (Matoshri) हे आमचे मंदिर असून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे संकटमोचक आहेत’ असे सांगून शिवसेनेचे बंडखोर माजी आमदार राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी बॅलन्स साधत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री शिंदे हे दोघेही नाराज होणार नाहीत, याची काळजी घेतली आहे. (Some Shiv Sena ministers were not working: Rajesh Kshirsagar)

कोल्हापूर उत्तरचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे यांचे बंड आणि संकटात सापडलेली शिवसेना या दोन्हीबाबत सहानुभूतीपूर्वक भाष्य केले. ते म्हणाले की, शिवसेनेत दर १० ते १५ वर्षांनी बंडाची परिस्थिती का निर्माण होते, ती कशामुळे येते, याचा विचार व्हायला हवा. तसेच, शिवसेनेचे काही मंत्री कामच करत नव्हते. जे घडले, ते घडायला नको होते. मला खात्री आहे की राज्यातील शिवसैनिक आम्हाला गद्दार म्हणणार नाहीत.

Uddhav Thackeray-Eknath Shinde-Rajesh Kshirsagar
आमचा देव मंदिरातच योग्य होता; पण... : राजेश क्षीरसागरांचे उद्धव ठाकरेंबाबत भाष्य

शिवसेनेच्या आमदारांची जी कामे व्हायला हवी होती, तीही कामे होत नव्हती; म्हणून आम्ही गुवाहाटील गेलो होतो. एकनाथ शिंदे यांनी आम्हा सर्वांना निधी दिला होती. त्यांनी मदत केली म्हणूनच आम्ही त्यांच्यासोबत आहोत. मी गेल्या ३६ वर्षांत कधीच इकडे तिकडे गेलो नाही. सन २०१४ पासून दरवेळी माझं नाव मंत्रीपदासाठी चर्चेत असायचं. मात्र, मंत्रिमंडळात मला कधीच स्थान मिळाले नाही, अशी खंतही राजेश क्षीरसागर यांनी बोलून दाखवली.

Uddhav Thackeray-Eknath Shinde-Rajesh Kshirsagar
'मध्यावधी निवडणुका झाल्यास शिवसेनेचे १०० आमदार निवडून येतील'

राज्याच्या मंत्रिमंडळात कोणाला घ्यायचे, याचे सर्व अधिकार एकनाथ शिंदे यांना दिले आहेत. उपयुक्त आमदारांना मंत्री केलं तर सर्व सुकर होतं. विधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत जेव्हा शिवसेना-भाजप युती तुटली, तेव्हा सुभाष देसाई पराभूत झाले होते. त्यानंतरही त्यांना मंत्री करण्यात आले होते. मलादेखील कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा आहे. मला जर काही जबाबदारी मिळाली तर नक्कीच चांगले काम करेन. माझ्यासारख्या अनुभवी नेत्याचा वापर केला, तर नक्की फायदा होईल. पण, तो निर्णय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा आहे, असेही त्यांनी आपल्या मंत्रीमंडळातील समावेशाबाबत सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com