'काही लोकांना आपण मुख्यमंत्रीच झाल्याचा भास' : सुजय विखेंचा निलेश लंकेंवर खोचक वार

Sujay Vikhe : सुजय विखे कुणाला घाबरतो, माझ्यावर दडपण आले आहे, असे अजिबात नाही.
Nilesh Lanke News, Dr. Sujay vikhe News, Ahmednagar News in Marathi
Nilesh Lanke News, Dr. Sujay vikhe News, Ahmednagar News in MarathiSarkarnama

अहमदनगर : कोरोना काळात पारनेर मतदारसंघात केलेल्या कामामुळे चर्चेत आलेले राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार निलेश लंके यांच्यावर खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी टीका केली आहे. 'काही लोकांना कमी काळात आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याचा भास झाला आहे, त्याला आपण काही करू शकत नाही,' असा अप्रत्यक्ष खोचक टोला सुजय विखे यांनी निलेश लंके (Nilesh Lanke) यांना लगावला आहे. भारतीय जनता पक्ष आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

Nilesh Lanke News, Dr. Sujay vikhe News, Ahmednagar News in Marathi
धोका असलेल्या घरांची यादी तयार करा, मुख्यमंत्री सहायता निधीतून १० हजार मिळणार!

सुजय विखे म्हणाले की, कुणाला वाटत असेल सुजय विखे कुणाला घाबरतो, सुजय विखेंवर दडपण आले आहे, असे अजिबात नाही. एक महिन्यात पारनेर तालुक्यातून एकही अनधिकृत वाळूचे डंपर जाणार नाही, असा इशारा देखील सुजय विखे यांनी दिला आहे. तहसीलदारांमार्फत धाडी टाकून गरीबांकडून पैसे उकळणे आजपासून पारनेर (Parner) तालुक्यात बंद होणार, असा इशाराच त्यांनी दिला.

पारनेरमधील वाळू उपसाच्या मुद्द्यावर विखे आक्रमक झाले आहेत. अनधिकृत वाळू उपसा असले प्रकार बंद होणार असे, विखे म्हणाले. राधाकृष्ण विखे जोपर्यंत महसूल मंत्री आहेत, तोवर एक महिन्यामध्ये एकही अनधिकृत वाळूचे डंपर पारनेर या ठिकाणाहून जाणार नाही, असा विश्वास त्यांनी उपस्थितांना दिला. वाळू उपसा करणारे कार्यकर्ते नकोत आम्हाला, गुंड कार्यकर्ते ज्यांच्यापासून समाजाला धोका आहे, नको आहेत, असेही विखे म्हणाले.

Nilesh Lanke News, Dr. Sujay vikhe News, Ahmednagar News in Marathi
गुलाबराव पाटलांचा बौद्धिक विकास झालेला नाही; रुपाली पाटलांनी जखमेवर मीठ चोळलं

तसेच यावेळी विखे म्हणाले, 'परिस्थिती नेहमी बदलत असते. लोक मंत्री होतात-जातात. मात्र काही जणांना कमी काळामध्ये आपण मुख्यमंत्री झाल्याचा भास झाला, त्याला आपण काहीही करू शकत नाही. मागील अडीच वर्षात जे दिसले नाहीत, असे काही चेहरे आता दिसत आहेत, अशी टीकाही यावेळी त्यांनी केली. दरम्यान, आपल्या पक्षात आणखी काही लोक येणार आहेत, असेही विखे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com