'ग्लोबल टीचर' डिसलेंचा पाय खोलात; जिल्हा परिषदेनेच केला गुरुजींच्या निषेधाचा ठराव

ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले (Ranjitsinh Disale) हे आता चांगलेच अडकले आहेत.
Ranjitsinh Disale
Ranjitsinh DisaleSarkarnama

सोलापूर : ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले (Ranjitsinh Disale) हे आता चांगलेच अडचणीत आहेत. अधिकाऱ्यांनी मानसिक त्रास दिल्याचा आणि पैसे मागितल्याचा खळबळजनक आरोप डिसलेंनी केला होता. डिसले यांनी जिल्हा परिषदेचे (ZP) बदनामी केल्याने त्यांचा सर्वसाधारण सभेत निषेध करण्यात आला. यामुळे जिल्हा परिषद प्रशासनासह पदाधिकाऱ्यांनी डिसले गुरुजी प्रकरणावर आक्रमक भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. (Ranjitsinh Disale News)

डिसले गुरुजींच्या आरोपांमुळे सोलापूर जिल्हा परिषदेची राज्यभरात बदनामी झाली आहे. याचे पडसाद जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत उमटले. अनिरुद्ध कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या ऑनलाईन सभेत डिसले गुरुजींचा निषेध करण्यात आला. जिल्हा परिषद, शाळा आणि प्रशासनाची बदनामी केल्याप्रकरणी हा निषेध करण्यात आला. अधिकाऱ्यांनी मानसिक त्रास देऊन पैशांची मागणी केल्याचा निराधार आरोप करून डिसले यांनी बदनामी केल्याबद्दल सभेत वसंतनाना देशमुख यांनी हा निषेध केला. प्रशासनाची बाजू ऐकून न घेता शिक्षणमंत्र्यांनी दबाव आणला, अशी भूमिका काही सदस्यांनी घेतली. सभेत नियमाने कामकाज केल्याबद्ददल मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी आणि शिक्षणाधिकारी डॉ.किरण लोहार यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला.

Ranjitsinh Disale
शिवसेनेशी पंगा घेणाऱ्या राणे अन् महाजनांवर भाजपनं टाकली मोठी जबाबदारी

डिसले गुरुजी प्रकरणात जिल्हा परिषदेने कठोर भूमिका घेतली आहे. डिसले गुरुजींच्या संदर्भात 2021 मध्ये झालेल्या चौकशीचा अहवाल प्राथमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे पाठविला आहे. हा विषय संवेदनशील असल्याने याची पडताळणी करण्याच्या सूचना स्वामी यांनी सामान्य प्रशासन विभागाला दिल्याचे समजते. डिसले गुरुजी यांचा माफीनामा, पाच जणांच्या चौकशी समितीचा अहवाल या बाबी जिल्हा परिषद बारकाईने व काटेकोरपणे हाताळत आहे.

Ranjitsinh Disale
'पार्टीगेट' प्रकरणात ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या चार सहकाऱ्यांचा तडकाफडकी राजीनामा

या सर्व प्रकरणात डिसले गुरुजींनी अडचणीत येताच माफीनामा सादर करून या वादावर पडदा टाकण्याचा निर्णय घेतला होता. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना डिसले यांनी दोन पानी पत्र पाठवले होते. या पत्रात त्यांनी झालेल्या प्रकाराबाबत माफी मागितली होती. यापुढे थेट प्रसारमाध्यमांसमोर जाणार नाही, अशी कबुलीही डिसले यांनी दिली होती. त्यांनी आता माफीनामा सादर करीत हे प्रकरण थांबवण्याची मागणी केली आहे. डिसले यांच्या माफीनाम्याची जोरदार चर्चा सध्या जिल्हा परिषदेत रंगली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com