Solapur University Election: युवासेना-संभाजी ब्रिगेडची ‘सुटा’शी हातमिळवणी; शिंदे गटाचे अस्तित्व दिसेना

पदवीधर मतदारसंघातील जागांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.
Solapur University
Solapur University Sarkarnama

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील (Punyashlok Ahilya Devi Holkar Solapur University) सिनेट निवडणूक (election) रंगात आली आहे. निवडणुकीसाठी अर्ज करण्याचा आज (ता. १२ सप्टेंबर) शेवटचा दिवस आहे. विद्यापीठात आपलेच वर्चस्व राहावे, यासाठी सर्वपक्षीय संघटना कामाला लागल्या आहेत. त्याच पद्धतीने ‘सुटा’ संघटनेने विविध पक्षांशी बोलणी करून आघाडीचे गणित जमविले आहे. यामध्ये माजी शिक्षक आमदार दत्तात्रेय सावंत, प्राचार्य संघटना, संस्थाचालक संघटना, रिपाइं, संभाजी ब्रिगेड, युवा सेना (yuvasena), तसेच काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) समावेश आहे. त्यामुळे सिनेट निवडणुकीत सध्या ‘सुटा’ आणि सहयोगी पक्षाचे पारडे जड दिसत आहे. एकीकडे सर्वच पक्ष निवडणुकीत व्यस्त असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे मात्र अस्तिव दिसत नसल्याची चर्चा विद्यापीठाच्या वर्तुळात आहे. (Solapur University Election: Yuva Sena-Sambhaji Brigade join hands with 'Suta')

सोलापूर विद्यापीठात सिनेटच्या निवडणुकीत अधिसभा प्राचार्यांच्या दहा, शिक्षक व पदवीधरांसाठी प्रत्येकी दहा आणि संस्था प्रतिनिधी सहा, विद्यापीठ शिक्षकांच्या तीन जागांसाठी येत्या २९ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. अर्ज भरण्याची आज (ता. १२ सप्टेंबर) शेवटची मुदत आहे. अर्जांची छाननी १३ सप्टेंबर रोजी होणार असून १६ सप्टेंबरपर्यंत अर्ज माघारीची मुदत आहे. ता. ३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत मतमोजणी होणार आहे.

Solapur University
‘भास्करशेठ येऊदे, नाहीतर रामदासभाई; गुहागरचा पुढील आमदार मनसेचाच’

दरम्यान, निवडणुकीत मागासवर्गीय प्राध्यापक संघटनेने ताठर भूमिका घेतली आहे. शिक्षकांच्या सर्वच जागा लढवण्यावर मागासवर्गीय प्राध्यापक संघटना आडून आहे. पदवीधर मतदारसंघातील जागांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. या सर्व घडामोडीत ‘सुटा’ संघटनेने समीकरणांची जुळवाजुळव करत सर्वच जागांवर वर्चस्व राखण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

Solapur University
कदम पिता-पुत्रांचा आदित्य ठाकरे घेणार समाचार; दापोलीत १६ सप्टेंबरला 'निष्ठा यात्रा'

सुटाने युवा सेना व संभाजी ब्रिगेडशी हातमिळवणी केली आहे. त्यांनी प्रत्येकी दोन जागा द्याव्यात, अशी मागणी केली आहे. मात्र, सुटा प्रत्येकी एक जागा सोडण्यास तयार आहे. याशिवाय काँग्रेस, राष्ट्रवादी आणि माजी आमदार दत्तात्रेय सावंत यांनाही एक जागा ‘सुटा’कडून देण्यात आली आहे. शिक्षक सदस्यांसाठी मागासवर्गीय संघटनेची लढाई ‘सुटा’च्या विरोधात होऊ शकते. पदवीधरमधून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आव्हान या संघटनांच्या विरोधात लढत होण्याची शक्यता आहे.

Solapur University
अमित शहांच्या ‘त्या’ इशाऱ्यानंतर उद्धव ठाकरेंनी ‘यूपी’तील शिवसेना नेत्यांना लावले कामाला!

डोंगरे, सपाटेंना उमेदवारी?

सोलापूर विद्यापीठाची सिनेट निवडणूक संभाजी ब्रिगेडला सोबत घेऊन लढविणार असल्याचे युवा सेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी दोन दिवसांपूर्वी सोलापुरात बोलताना स्पष्ट केले होते. युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष गणेश डोंगरे यांना पदवीधरमधून, तर राष्ट्रवादीचे माजी महापौर मनोहर सपाटे यांची कन्या मंजुळा सपाटे यांना ‘सुटा’ने उमेदवारी देण्यात आली आहे. ‘सुटा’सोबत जाण्याचा निर्णय रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनीही घेतला आहे. तसेच सुटा ही संभाजी ब्रिगेड व युवा सेनेला सोबत घेण्याच्या तयारीत आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे अस्तित्व मात्र या निवडणूक अद्याप तरी दिसत नसल्याची चर्चा होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in