राज्यपाल कोश्यारींना सोलापुरात शिवभक्त रोखणार

छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांच्याविषयी भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या विधानावरून मोठा वाद निर्माण झाला आहे.
Bhagat Singh Koshyari
Bhagat Singh Koshyarisarkarnama

सोलापूर : ''चाणक्यांशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल ? समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल?, असं वादग्रस्त विधान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी औरंगाबाद येथील कार्यक्रमात रविवारी केले. छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांच्याविषयी भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या विधानावरून मोठा वाद निर्माण झाला आहे.

कोश्यारी यांनी केलेल्या विधानाचे ठिकठिकाणी पडसाद उमटताना दिसून येत आहेत. सोलापुरात ४ मार्चला राज्यपालांचा दौरा आहे. या पार्श्वभूमीवर सोलापुरातील शिवभक्तांनी राज्यपालांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. कोश्यारींनी माफी मागावी, अन्यथा त्यांचा दौरा रोखणार असल्याचा इशारा येथील शिवभक्तांनी दिला आहे.

सोलापुरात विवेकानंद केंद्राच्यावतीने 'वयम'या प्रकल्पाचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. याची माहिती शिवप्रेमींना मिळताच त्यांनी आयोजक तसेच जिल्हाधिकाऱ्यांना आपला राज्यपालांच्या दौऱ्याला विरोध असल्याबाबत कळवले. त्यानंतर शिवप्रेमींनी बैठक घेत राज्यपालांच्या दौऱ्याबाबत काय भूमिका घ्यायची याबबत चर्चा केली.

''कोश्यारी यांनी छत्रपती शिवरायांबाबत केलेल्या विधानाची माफी मागवी. अन्यथा 4 तारखेला संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात रास्तारोको आंदोलन करण्यात येईल.

Bhagat Singh Koshyari
राज्यपालांची उचलबांगडी करा, अन्यथा त्यांचे धोतर फेडणार!

विमानतळाबाहेर वीस ते पंचवीस हजार शिवप्रेमी उपस्थितीत आंदोलन करतील,'' असा इशाराही शिवप्रेमींनी दिला आहे. शिवप्रेमींसोबतच विविध पक्षाचे पदाधिकारी देखील या बैठकीला उपस्थित होते.

Bhagat Singh Koshyari
राज्यात वीजटंचाईचे सावट, भारनियमनाची शक्यता

मराठा समाजाचे नेते विनोद पाटील (Vinod Patil)यांनीही राज्यपालांवर निशाणा साधला आहे. ''राज्यपालांनी नविन जावईशोध लावला. पदावर आहात, ज्येष्ठ आहात म्हणून मुलाहिजा करतो. छत्रपती शिवरायांबद्दल भावना, संवेदना नसतील, तर त्याविषयी बोलताना नको त्या विषयात नाक खुपसू नये. आपले छत्रपतींविषयीचे खरे विचार काल आपसूक बाहेर आले. आपलं वय आणि वक्तव्य बघता तुम्हाला निवृत्तीची गरज आहे, असे आम्हाला वाटते,'' असे विनोद पाटील म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com