
Solapur Political News : पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील २३ गावांसाठी २५:१५ योजनेतील मंजूर एक कोटीचा निधी महाविकास आघाडी सरकारच्या काळात थांबवला होता. या निधीस ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मंजुरी दिल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली. यामुळे मतदारसंघातील कामे वेळेत पूर्ण होणार असली तरी आवताडेंनी ठाकरे सरकारवर अप्रत्यक्षपणे केलेल्या आरोपांनी मात्र धुरळा उडण्याची शक्यता आहे. (Latest Political News)
महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील २३ गावातील रस्त्यांसह इतर कामांसाठी २५-१५ योजनेअंतर्गत मिळणारा निधी प्रलंबित होता. यामुळे या तालुक्यांतील विकास खुंटल्याचा आरोप होत होता. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये हा निधी उपलब्ध होऊ शकला नाही. सत्ता बदलानंतर रखडलेल्या या निधीसाठी आमदार आवताडेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाठपुरावा केला. यानंतर हा प्रलंबित निधी मतदारसंघाच्या पदरी पडल्याचे समाधान आवताडेंनी (Samadhan Awatade) स्पष्टच सांगितले.
पंढरपूर तालुका : शिरढोण येथील सबस्टेशन ते चांगदेव व्हरगळ वस्ती रस्ता मुरमीकरण व खडीकरण, कोर्टी येथील महादेव ननवरे वस्ती ते सुभाष काळे वस्ती रस्ता मुरमीकरण व खडीकरण, रांझणी ते एकलासपूर रस्ता खडीकरण व मुरमीकरण, अनवली येथील श्री सिद्धनाथ मंदिर ते शेख वस्ती रस्ता मुरमीकरण व खडीकरण, गोपाळपूर येथील इंदिरा कॉलनी अंतर्गत गटार, गादेगाव येथील लक्ष्मी नगर ते सोनके शिव खडीकरण, कौठाळी येथील जयराम वस्ती ते बंधारा रस्ता खडीकरण, खर्डी येथील चव्हाण वस्ती रामोशी मळा ते शिरभावी रस्ता खडीकरण व मुरमीकरण.
मंगळवेढा तालुका : रहाटेवाडी येथील श्री हनुमान मंदिर ते जिल्हा परिषद शाळा रस्ता कॉंक्रिटीकरण, मुंढेवाडी येथील नवीन ग्रामपंचायत कार्यालय ते घोडके वस्ती रस्ता खडीकरण व मुरमीकरण, कर्जाळ येथील कर्जाळ ते गैबीपीर मंदिर रस्ता खडीकरण व मुरमीकरण,चोखामेळामधील येथील धनाजी खवतोडे घर ते सोमा बुरजे घर रस्ता काँक्रिटीकरण,डोंगरगाव ते खोमनाळ हेंबाडे, पठाण, चव्हाण, मोरे वस्ती मार्गे जाणारा रस्ता मुरमीकरण व खडीकरण,आंधळगाव ते गोणेवाडी रस्ता मुरमीकरण व खडीकरण, कर्जाळ ते गैबीपीर मंदिर रस्ता खडीकरण व मुरमीकरण, मंगळवेढा हायवे ते कारंडे वस्ती(कात्राळ) रस्ता मुरमीकरण व खडीकरण, अरळी स्मशानभूमी बंधाऱ्या वरील सर्व रस्ते मुरमीकरण व खडीकरण, खवे येथील विस्टव्वा देवी ते मारुती मंदिर रस्ता काँक्रिटीकरण, डोंगरगाव येथील डोंगरगाव ते हाजापुर शिव रस्ता मुरमीकरण व खडीकरण, डोणज येथील सार्वजनिक स्मशानभूमी येथे पेव्हर ब्लॉक बसविणे, आंधळगाव येथील जिल्हा परिषद शाळा ते काळंबा देवी मंदिर गटार बांधणे.
(Edited by Sunil Dhumal)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.