Solapur News : निवडणुकीचे आव्हान देणाऱ्या देशमुखांना काडादींनी करुन दिली 'त्या' पराभवाची आठवण

Solapur News : त्यांना पराभवाची चाखायला लावणार..
Vijaykumar Deshmukh, Dharmaraj Kadadi
Vijaykumar Deshmukh, Dharmaraj Kadadi sarkarnama

Solapur News : सोलापूर शहराच्या विमानसेवेसाठी सिद्धेश्वर कारखान्यांची चिमणी अडचणीत ठरत असल्याचा मुद्या गाजत असताना आता भाजप आमदार विजयकुमार देशमुख (Vijaykumar Deshmukh)आणि सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक धर्मराज काडादी (Dharmaraj Kadadi) यांच्यात शाब्दीक युद्ध सुरु झाले आहे.

देशमुख यांनी काडादी यांना राजकारणाच्या मैदानात उतरण्याचे आव्हान दिले आहे. त्याला काडादी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. "धर्मराज काडादी यांनी निवडणुकाच्या मैदानात उतरावे, आपण त्यांना पराभवाची चाखायला लावणार," असे त्यांनी नुकतेच म्हटलं होते, त्याला धर्मराज काडादी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

"सिद्धेश्वर कारखान्याच्या निवडणुकीतच देशमुखांना चारीमुंड्या चीत केले आहे. कारखान्याच्या विकासात सिद्धेश्वर परिवाराचा मोठा सहभाग आहे, हे देशमुख विसरले आहे," असा टोला धर्मराज काडादी यांनी देशमुखांना हाणला आहे.

Vijaykumar Deshmukh, Dharmaraj Kadadi
Sanjay Raut News : शिंदे सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही, १६ आमदार लवकरच अपात्र ठरतील ; राऊतांचा दावा

धर्मराज काडादी म्हणाले, "सिद्धेश्वर परिवाराच्या विरोधात १९९६ मध्ये ते निवडणुकीच्या मैदानात होते. तेव्हा त्यांना सिद्धेश्वर पॅनलने धूळ चारलेली आपण पाहिली आहे. परंतु २००१च्या कारखान्याच्या निवडणुकीत ते माघार घेणार होते पण मी मध्यस्थी केल्याने त्यांनी निवडणुक लढवली. त्यानंतर ते दहा वर्ष कारखान्यावर संचालक म्हणून राहिले, ते सिद्धेश्वर परिवारामुळेच. २००४ पासून त्यांनी ज्या निवडणुका लढविल्या त्यात सिद्धेश्वर परिवार त्यांच्यासोबत राहिला आहे हे ते विसरलेले दिसतात,"

Vijaykumar Deshmukh, Dharmaraj Kadadi
Congress News : 'भारत जोडो यात्रे' नंतर प्रजासत्ताक दिनापासून काँग्रेसचे हे नवीन अभियान सुरु होणार

"बाजार समितीच्या निवडणुकीत ते अडचणीत होते, तेव्हा त्यांनी सिद्धेश्वर परिवारासोबत बोलणी केली, तेव्हा सिद्धेश्वर परिवाराने त्यांना पाठिंबा दिला. आज ते सभापती आहेत. त्याच्या राजकीय यशात सिद्वेश्वर परिवाराचा मोठा वाटा आहे. ते सिद्धेश्वर परिवाराशिवाय काही करु शकत असतील तर त्यांनी ते करावे," असा खोचक सल्ला काडादी यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com