निष्ठावंतांच्या तक्रारीनंतर राष्ट्रवादीची कोअर कमिटी बरखास्त?

कोअर कमिटीमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून पराभूत व इतर उमेदवारांना संधी दिल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे करण्यात आली.
solapur ncp
solapur ncpsarkarnama

सोलापूर : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर अस्तित्वात आलेल्या कोअर कमिटीमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून पराभूत व इतर उमेदवारांना संधी दिल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रसचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांच्याकडे करण्यात आली. त्यानंतर पवार यांनी कोअर कमिटी बरखास्त करण्याची सूचना संबंधित नेत्याला दिली असल्याची चर्चा राष्ट्रवादीच्या गोटात सुरू आहे. (Solapur NCP Core Committee dismissed after complaints from loyalists)

आजपर्यंतच्या इतिहासात सोलापूर महापालिकेवर १९९८ आणि २०१४ ची निवडणूक वगळता कॉंग्रेसची सत्ता कायम राहिली. तर महापालिकेत राष्ट्रवादीची सदस्या संख्या सर्वाधिक १६, तर कमीत-कमी चार इतकी राहिली आहे. त्यामुळे कॉंग्रसेला महापौर, तर राष्ट्रवादीला उपमहापौरपद मिळाले. परंतु, राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर पक्षांतराच्या नादात भरकटलेल्या सदस्यांना चमत्कार घडविण्याचा साक्षात्कार झाला अन्‌ महापालिकेत राष्ट्रवादीची कमी असलेली ताकद वाढविण्याची प्रतिज्ञा करून राष्ट्रवादीचाच महापौर होईल, असे पक्षश्रेष्ठींना पटवून सांगितले.

solapur ncp
भगिरथ भालकेंनी शेवटपर्यंत त्या याद्या मला दिल्याच नाहीत : जयंत पाटलांनी सांगितले पराभवाचे कारण

इतिहास रचण्यासाठी पक्षाने महेश कोठे यांच्या हाती सोलापूरचे नेतृत्व दिले. महापालिकेत राष्ट्रवादीची ताकद वाढविण्यासाठी प्रभाग रचनेमध्येदेखील कोठे यांनी प्रशासनाला मार्गदर्शन केले. निवडणुकीची पहिली पायरी असलेल्या प्रभागरचनेत राष्ट्रवादीने यश मिळविले. त्यानंतर महापालिका निवडणुकीची पुढील सुत्रे हलविण्यासाठी बारा जणांची कमिटी स्थापन केली. या कमिटीमध्ये शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, गटनेते किसन जाधव, नगरसेविकास सुनीता रोटे, नगरसेवक महेश कोठे, नगरसेवक तौफिक शेख, महेश गादेकर, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, माजी महापौर मनोहर सपाटे, नगरसेवक यू. एन. बेरिया, जुबेर बागवान, सुधीर खरटमल अशा बाराजणांची निवड करण्यात आली.

solapur ncp
चमकोगिरी करणाऱ्या राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांना पदावरून हटवा : संतप्त जयंत पाटलांचा आदेश

या कोअर कमिटीतील निवडी या पक्षासाठी मारक असल्याची तक्रार निष्ठावंत कार्यकर्त्यांनी पक्षप्रमुख खासदार शरद पवार यांची समक्ष भेट घेऊन केली. पडद्यामागून राष्ट्रवादीचे काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी तक्रारीमध्ये म्हणाले की, कोअर कमिटीमध्ये कार्यकर्ते नसलेल्या नेत्यांची गर्दी आहे. पराभूत झालेले उमेदवार आणि उपऱ्या नेत्यांना दिलेली संधी ही पक्षासाठी मारक ठरणार असल्याचे सांगितले. या तक्रारीवर पवार यांनी डोळे वटारले असून, संबंधित नेत्याला कोअर कमिटी बरखास्त करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, स्थानिक स्तरावर त्याची उघडपणे चर्चा होत नसली तरी तक्रारदाराचा शोध कोअर कमिटीतील नेतेमंडळी घेत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com