16 महिन्यांच्या पोटच्या मुलीवर अत्याचार : खूनी मातापित्यांना मरेपर्यंत फाशी

सोलापूर सत्र न्यायालयाचा कठोर निकाल; रेल्वे पोलिसांमुळे सापडले होते आरोपी..
High Court
High Court Sarkarnama

सोलापूर : स्वतःच्या सोळा महिन्याच्या मुलीवर अत्याचार करून तिचा ओढणीने फास देऊन खून केल्याबद्दल येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. यु. एल. जोशी (Solapur District court gives death penalty to Father and mother of girl child) यांनी गुरुवारी (ता.२) आई व वडिलास मरेपर्यंत फाशीची शिक्षा सूनावली.

या प्रकरणाची हकिकत अशी की, ०३ जानेवारी २०२२ रोजी पहाटे ४ वाजताचे सुमारास यातील मयत अल्पवयीन मुलगी (वय १६ महिने) हिचेवर तिचा पिता आरोपी धोलाराम बिष्णोई (वय २६) याने त्याचे राहते घरी (रामपल्ली, आर.एल.नगर, हैद्राबाद) बालिकेला दारु पाजून तिच्यावर नैसर्गिक, अनैसर्गिक पध्दतीने लैगिंक अत्याचार केला. या अत्याचारामुळे तिला वेदना होत असल्यामूळे ती मुलगी रडत असताना तिचा आवाज बंद करण्याकरिता ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून तिचा खून केला. आरोपी धोलाराम बिष्णोई याची पत्नी पुनीकुमारी बिष्णोई हिने देखील कृत्य करण्यास धोलाराम यास मदत केली.

High Court
राज्यसभा निवडणुकीबाबत अजितदादांचं सूचक विधान : 'अर्ज सहा की सात, यावर चर्चा सुरू आहे!'

बालिकेच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याकरीता दोन्ही आरोपी मृतदेह घेऊन सिकंदराबादहून राजस्थान येथे जाण्यासाठी सिकंदराबाद- राजकोट एक्सप्रेस या रेल्वेने निघाले. तेव्हा रेल्वेतील प्रवाशांनी वाडी रेल्वे स्टेशन येथे या प्रकाराची तक्रार स्टेशन मास्टर यांच्याकडे केली. स्टेशन मास्तर यांनी तातडीने ही तक्रार सोलापूर रेल्वे स्थानकास पाठवली. सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी डॉक्टरांना पाचारण केल्यानंतर डॉक्टरांनी मृतदेहाची तपासणी करून मुलीचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. दोन्ही आरोपींना ताब्यात घेवून त्यांची पोलिसांकरवी कसून चौकशी करण्यात आली. शवविच्छेदन अहवालात बालिकेवर नैसर्गीक व अनैसर्गीक अत्याचार करून फास लागल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. सहायक पोलिस निरीक्षक अमोल गवळी यांनी सोलापूर लोहमार्ग पोलिस ठाणे येथे आरोपीं धोलाराम बिष्णोई (वय २६, धंदा मजुरी) व त्याची पत्नी पुनीकुमारी बिष्णोई (वय २०, रा. रामपल्ली, आर.एल.नगर, हैद्राबाद (तेलंगणा), मुळ गाव बारासण, तहसिल गुडामालाणी, जि. बाडमेर (राजस्थान) यांच्या विरोधात खुनासह विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला. गुन्हयाचा तपास पोलिस निरीक्षक संतोष गायकवाड यांनी करून येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

High Court
video : साकीनाका बलात्कार प्रकरणी कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत : डॉ. नीलम गोऱ्हे

या खटल्याची सुनावणी २६ एप्रिल २०२२ सुरु झाली. सुनावणीत सरकार पक्षाच्या वतीने एकूण ३१ साक्षीदार तपासण्यात आले. परिस्थितीजन्य पुरावा, वैद्यकीय पुरावा, डीएनए अहवाल आणि सीए अहवाल यांच्यावर आधारीत असल्याने त्याच्याशी निगडीत असा संपूर्ण पुरावा सरकारी पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील अॅड. प्रदिपसिंग राजपूत यांनी न्यायालयामध्ये सादर केला. प्रकरणातील साक्षीदार हे सिकंदराबाद, वाडी, सोलापूर, राजस्थान आणि नेपाळ या ठिकाणाहून तपासण्यात आले. नेपाळ येथील साक्षीदाराची तपासणी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आली.

न्यायालयाने दोन्ही आरोपींचे जबाब नोंदवत असताना आरोपींच्या मागणीनुसार बचावाचे साक्षीदारांची व सरकार पक्षाने तपासलेल्या साक्षीदारांपैकी सहा साक्षीदारांची फेरतपासणी केली गेली. त्यानंतर आरोपींनी बचावाचे साक्षीदारांची यादी हजर करण्यासाठी दिलेल्या मुदतीत बचावाचे साक्षीदार न्यायालयासमोर उपस्थित न ठेवल्याने आरोपींचा अर्ज न्यायालयाने नामंजूर केला. तद्नंतर या प्रकरणात दोन्ही पक्षांतर्फे युक्तीवाद ऐकण्यासाठी तारीख नेमण्यात आली.

High Court
राज्यसभा निवडणूक : हे ११ आमदार ठरवणारं विजय भाजपचा की शिवसेनेचा...

शिक्षेचा तपशील

न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राहय धरून न्यायालयाने आरोपी धुलीराम बिष्णोई यास भादवि कलम ३७७ अन्वये १० वर्षांची शिक्षा तसेच १ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १ महिन्याची शिक्षा, तसेच आरोपी क्र. १ व २ यांना भादवि कलम २०१ सह ५११ अन्वये ०३ वर्षांची शिक्षा तसेच १ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १ महिन्याची शिक्षा, तसेच आरोपी क्र . १ व २ यांना भारतीय रेल्वे कायदा कलम १३५ अन्वये ०६ महिन्यांची शिक्षा तसेच १ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १ महिन्याची शिक्षा, तसेच आरोपी क्र. २ यांना पोक्सो कायदा कलम २१ अन्वये ०६ महिन्यांची शिक्षा तसेच ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास १ महिन्याची शिक्षा सुनावली. तसेच आरोपी धुलीराम बिष्णोई व पुनीकुमारी बिष्णोई यांना भादवि कलम ३०२ सह ३४ अन्वये मरेपर्यंत फाशीची शिक्षा तसेच आरोपी धुलीराम यास यांना पोक्सो कायदा कलम ६ अन्वये मरेपर्यंत फाशीची शिक्षा तसेच २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com