Satara Palika : तर राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वांनी मला ठेवलं असतं का... उदयनराजेंचा सवाल

संपूर्ण सत्तास्थाने त्यांच्याकडे, २० वर्षे निर्विवाद सत्ता होती undisputed power for 20 years , सगळी पदे होती. पालकमंत्री, नगरपालिकेसह Nagarpalika सगळे असताना एकही काम झालं नाही. त्यावेळी कामे का झाली नाहीत.
Sharad Pawar, Udayanraje Bhosale
Sharad Pawar, Udayanraje Bhosalesarkarnama

सातारा : सातारा पालिकेत आम्ही पैसे खाल्ले असते तर तुम्हीच सगळ्यांनी हेडलाईन केली असती. पण, आम्ही कोणतेही गैर काम करत नाही, गैर खपवून घेत नाही. तसं असतं तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा यांनी मला ठेवलं असतं का. पाच रूपयाचा घोटाळा केला असता तर ते फोकस करून माझ्यावर आरोप केलं असते, अशा शब्दात खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.

भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी केलेल्या आरोपाला त्यांच्याच शैलीत उदयनराजेंनी प्रतिउत्तर दिले. तसेच त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यावर ही निशाणा साधला. उदयनराजे म्हणाले, वारंवार आमच्याविरोधात आवाज उठवत भ्रष्टाचार केला म्हणत आहेत. पण, भ्रष्टाचाराचे स्पेलिंग मला माहिती नाही. तसे असते तर जे ज्येष्ठ विचारवंत जे माझ्यावर आरोप करतात, त्यांना थोडी तरी जनाची नाही मनाची तरी त्यांना वाटली पाहिजे.

Sharad Pawar, Udayanraje Bhosale
Satara: पालिकेची निवडणूक आल्यानेच उदयनराजेंची दिल्लीत नौटंकी.. शिवेंद्रसिंहराजे

कोणतेही पुरावे त्यांच्याकडे नाही. ज्यावेळी यांच्याकडे संपूर्ण सत्तास्थाने होती, २० वर्षे निर्विवाद सत्ता होती, सगळी पदे होती. पालकमंत्री, नगरपालिकेसह सगळे असताना एकही काम झालं नाही. त्यावेळी कामे का झालं नाहीत. कारण, त्यावेळी ही मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार होत होता. याला दुसरे काही ही कारण असणार नाही. दूरदृष्टीच अभाव, इच्छा शक्तीचा अभाव, आपल्याशिवाय पर्याय नाही, या घराण्याचे वलयच इतकं मोठं आहे. त्यामुळे लोक त्यांच्यासोबत राहात होते.

Sharad Pawar, Udayanraje Bhosale
Satara : उदयनराजे फडणवीसांना भेटताच... शिवेंद्रसिंहराजेंचा पत्ता कट झाल्याची चर्चा...

सत्ता असो व नसो... नगरसेवकांपासून मी सुरवात केली. त्यावेळेपासून आम्ही तळमळीने काम करत आहोत. आम्ही अनेक आंदोलने केली आमच्यावर केसेस झाल्या. पण आमच्याकडे सत्ता नसल्याने पर्याय नव्हता. नियोजन शून्य अक्कल शून्य असे नावे ठेवली गेली. गावाने ओवाळून टाकलेली उदयनराजे व त्यांची सगळी टीम आहे, असे आरोप झाले.

Sharad Pawar, Udayanraje Bhosale
Satara : डाॅल्बी वाजलीच पाहिजे... दोन तासांत काय आभाळ कोसळणार का... उदयनराजे भडकले

पण आम्ही नागरीकांच्या आरोग्याला धोका होता कामा नये, अशी आमची भावना आहे. पालिकेतील विविध कामांत आम्ही पैसे खाल्ले असते तर तुम्हीच सगळ्यांनी हेडलाईन केली असती. पण, आम्ही कोणतेही गैर काम करत नाही. तसेच गैर कामे खपवून घेत नाही. तसे केले असते त्यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा यांनी मला ठेवलं असतं का. पाच रूपये इकडे तिकडे झाले असते तरी ते फोकस करून आमच्यावर आरोप केलं असते, अशा शब्दात त्यांनी पवारांवर निशाणा साधला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com