मदन भोसलेंना शेतकऱ्यांनी उसाचं टिपरू दाखवलं का? महेश शिंदे म्हणतात, 'सत्य असू शकेल!'

शिवसेना (shivsena) हा पक्ष महाविकास आघाडीची भूमिका बजावत आहे.
MLA Mahesh Shinde, Madan Bhosale
MLA Mahesh Shinde, Madan Bhosalesarkarnama

सातारा : सभापती रामराजेंनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत (Satara) आम्हाला सहकारात राजकारण आणायचे नाही, असे सांगितले होते. तीच भूमिका घेऊन आम्ही मदनदादा भोसले यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. मदन भोसले हे यशवंत विचार घेऊन वाटचाल करत असून हा यशवंत विचार टिकला पाहिजे, यासाठी आम्ही दादांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला, असे स्पष्ट मत कोरेगावचे आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) यांनी व्यक्त केले.

कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन येथे किसन वीर कारखान्याच्या प्रचारासाठी आमदार महेश शिंदे आले होते. त्यावेळी त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. महेश शिंदे म्हणाले, ''राज्यात महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार आहे. त्यामुळे शिवसेना (shivsena) हा पक्ष महाविकास आघाडीची भूमिका बजावत आहे. सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीचे तीन, शिवसेनेचे दोन व काँग्रेसचा (Congress) एक आमदार आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आम्ही आपण सगळे महाविकास आघाडी म्हणून एकत्र राहू, असे राष्ट्रवादीला (Ncp) विचारले होते.

MLA Mahesh Shinde, Madan Bhosale
कृष्णप्रकाश हे बदलीवर अद्यापही नाराज, पवारानंतर आता ठाकरेंना भेटणार

मात्र, राष्ट्रवादीची भूमिका भाजपसोबत (Bjp) जाण्याची होती. त्यावेळी आम्ही जिल्हा बँकेत शिवसेनेचे तीन उमेदवार घ्यावेत, अशी मागणी केली. पण, तसे झाले नाही. नंतर त्याविषयी आम्ही राष्ट्रवादीचे नेते व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना विचारले होते. त्यावेळी त्यांनी सहकारात राजकारण आणायचे नसते, असे सांगितले होते. त्यामुळे आम्हीही सहकारात राजकारण आणायचे नाही, ही भूमिका घेऊन मदन भोसले यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. मदन भोसले हे यशवंत विचार घेऊन वाटचाल करत आहेत. हा यशवंत विचार टिकविला पाहिजे, यासाठी आम्ही दादांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतल्याचे शिंदे यांनी सांगितले.

पिंपोडे खुर्दमध्ये अशी एक पोस्ट व्हायरल झाली होती. मदन दादा प्रचाराला आले त्यावेळी शेतकऱ्यांनी ऊसाचे टिपरे दाखवले व त्यांनी पुढचे गाव प्रचारासाठी पाठवले, या प्रश्नावर महेश शिंदे म्हणाले, हे सत्य असू शकेल. याचे कारण जरंडेश्वर कारखाना हा खासगीकरण करण्यापूर्वी डॉ. शालिनीताईंच्या कुटुंबालाही अशाच रोषाला सामोरे जावे लागले. एकही हप्ता थकित नसताना, किरकोळ कर्ज असताना साडे नऊ कोटी राज्य सहकारी बँकेत शिल्लक असताना एक आवई उठवली होती. हा कारखाना ताई व त्यांच्या कुटुंबाने खाल्ला. मात्र, ते खोटे होते. लोकांना अंगावर घातले गेले. शेतकऱ्याला एफआरपी मिळालेली नाही ती देण्यासाठी आम्ही या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

MLA Mahesh Shinde, Madan Bhosale
भाजपच्या पोलखोलला शिवसेना कारनामे उघड करत देणार उत्तर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Mns) अध्यक्ष राज ठाकरेंच्या मुद्द्याचे समर्थन करता का, यावर महेश शिंदे म्हणाले, आज शेतकरी, युवकांचे प्रश्न पडलेले आहेत. ग्रामीण भागातील प्रश्न वेगळे आहेत. सामान्य जनतेला न्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. जरंडेश्वरचे शेअर्स कधी येतात आणि तो कारखाना सभासदांना कधी मिळेल, याकडे आमचे लक्ष असल्याचेही शिंदे म्हणाले. भाडळे खोऱ्यात पाणी कधी जाईल आणि शेतकरी सुखावेल. याच प्रश्नांवर आम्ही लक्ष केंद्रीत केले आहे. जरंडेश्वरचे वाटोळे कोणी केले, असे विचारले असता ते म्हणाले, ''गुरू कमोडिटीतील गुरू कोण आहे, औंधमध्ये कोणी तरी आहे, त्याच्यामुळे हे सगळे झाले असे म्हणतात. मात्र, यावर आमचे काहीही म्हणणे नाही. माणसे, पोरंबाळ सांगतात त्यांचे मी ऐकतो.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com