... तर कर्जत व जामखेडमध्ये लोकशाही राहणार नाही

खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Sujay Vikhe Patil ) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांच्यावर टीका केली.
Dr. Sujay Vikhe Patil
Dr. Sujay Vikhe PatilSarkarnama

अहमदनगर - अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या खासदार निधीतून शितपूर ( ता. कर्जत ) येथे सभा मंडप उभारण्यात आला. या सभा मंडपाच्या उदघाटन प्रसंगी बोलताना खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Sujay Vikhe Patil ) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांच्यावर टीका केली. ( ... so there will be no democratic process in Karjat and Jamkhed )

डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, आज येथे कोणीतरी आमदार आहे. नंतर कोणीतरी आमदार होईल. लोकशाही प्रक्रियेत प्रत्येक पक्षात त्याच्या कार्यकर्त्याला नेतृत्त्व स्वीकारण्याची मुभा दिली जाते. मात्र कार्यकर्त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये दबाव तंत्राने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घडविला जाणे अयोग्य आहे. अहमदनगर जिल्ह्यात पहिल्यांदा ही परिस्थिती आली की, कार्यकर्त्यांना दबाव तंत्राने पक्षात प्रवेश होणे कधी जिल्ह्याने पाहिले नव्हते.

Dr. Sujay Vikhe Patil
रोहित पवार म्हणाले, भाजपने महाराष्ट्राच्या संस्कृतीला लक्ष्य केलय...

ते पुढे म्हणाले की, संघर्ष आम्हाला नवा नाही. आमच्या संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य संघर्षात गेले. मात्र आम्ही कधी सुडबुद्धीने कोणावर कारवाई केली नाही. एखाद्या पक्षातील कार्यकर्त्यांना दबाव तंत्र वापरून स्वतःचा पक्ष वाढवित असाल तर याला कर्जत-जामखेडच्या जनतेला उत्तर द्यावेच लागेल. हे उत्तर जनतेने आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतून द्यावं.

माझ्या मागे सर्वसामान्य जनता आहे. त्यांच्या जोरावरच मी खासदार झालो. जी वेळ जिल्हा बँकेच्या संचालक, बाजार समिती संचालकांवर आली तीच वेळ हळूहळू सोसायटीवर येणार. मग सर्वसामान्य लोकांवर ही वेळ येणार. तेव्हा या कर्जत व जामखेड तालुक्यांत लोकशाही राहणार नाही. तेव्हा प्रत्येक व्यक्तीला या तालुक्यात जगणे अवघड होईल. या तालुक्यातील एकतरी अधिकारी हसताना दिसतो का? कर्जत तालुक्यात एक आमदार नाही तर दहा आमदार आहेत. एवढे पी.ए. व एवढी यंत्रणा की अधिकारी लघुशंकेला गेला तरी त्याच्या मागे माणूस लावला आहे. एवढा या विधानसभा मतदार संघात दबाव आहे. वेळ आल्यावर मी आमदारवर बोलेल, असे ही त्यांनी स्पष्ट केले.

Dr. Sujay Vikhe Patil
Video: "वाईन विकली तर ते किराणा दुकान मी बंद करेल",डॉ. सुजय विखे पाटील

तुमचे आमदार राष्ट्रीय महामार्गाची पाहणी करतात. जनतेने निवडून दिलेल्या व्यक्तीला तुम्ही कोणत्याही शासकीय प्रक्रियेत थांबवू शकत नाही. त्यांचा अधिकार आहे, त्यांनी रस्ता पहावा. हा रस्ता कोणी आणला. कसा आणला हे मी नंतर सांगेल. मात्र मी त्यांनी मंजूर करून आणलेल्या एकाच रस्त्याची अवस्था सांगतो. मिरजगावमधील रस्ता आमदारांनी मंजूर केला आहे. त्याची दुरवस्था आहे. तुम्ही राष्ट्रीय महामार्ग सोडा, तुम्ही आणलेल्या निधीतील रस्ता तरी पूर्ण करा. मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते कर्जतमध्ये सामाजिक न्याय विभागातर्फे वसतीगृह उभारण्यात येत आहे. त्याचे उद्घाटन झाले. या कामाची मंजुरी माजी मंत्री राम शिंदे यांनी दिली. निधी राम शिंदेंनीच आणला मात्र नारळ फोडण्यासाठी भलतेच लोक गोळा झाले. परत एकदा भाजपचे सरकार राज्यात आले असते तर माझी वडील कदाचित मंत्री असले असते. तसे जर झाले असते तर कर्जतमध्ये प्रश्नच ठेवला नसता, असे खासदार विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

या प्रसंगी तालुकाध्यक्ष डॉ. सुनील गावडे, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, सचिन पोटरे, अशोक खेडकर, सरपंच अनिल गाडकवाड आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com