म्हणून रोहित पवार यांच्या अंगावर काटा आला...

आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) हे 25 मे पासून लंडन दौऱ्यावर गेले आहेत.
Rohit Pawar
Rohit PawarSarkarnama

अहमदनगर - कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) हे 25 मे पासून लंडन दौऱ्यावर गेले आहेत. या वेळी त्यांनी ग्रेट ब्रिटनची राजधानी लंडनमधील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांना भेट दिली. यात व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझिअमचाही समावेश आहे. या संग्राहलयात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी वापरलेली वाघनखेही ठेवलेली पाहिली. ही वाघनखे पाहून आमदार रोहित पवार रोमांचित झाले. ( So Rohit Pawar got a thorn in his flesh ... )

आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या लंडन दौऱ्यात आज व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझिअमला भेट दिली. या संग्राहलयात अनेक ऐतिहासिक महत्त्वपूर्ण वस्तू संग्रहित करून ठेवल्या आहेत. त्यातच शिवाजी महाराज यांच्या वाघनखांचाही समावेश आहे.

या संदर्भात सोशल मीडियावर माहिती देताना रोहित पवार यांनी म्हंटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याच्या साह्याने अफजलखानाचा कोथळा काढला त्या वाघनख्या लंडनच्या 'व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम'मध्ये असल्याचं बोललं जातं. या म्युझियमला आवर्जून भेट दिली असता या वाघनख्या बघायला मिळाल्या आणि महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास आठवून अंगावर अक्षरशः शहारे आले, असे त्यांनी म्हंटले आहे.

Rohit Pawar
रोहित पवारांनी अहल्यादेवी होळकरांच्या जयंतीची चौंडीत केली तयारी : राम शिंदेंची झाली कोंडी

या शिवाय शिक्षण घेण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्या घरात राहिले. त्या घरालाही भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. या वेळी त्यांच्या समवेत आमदार अतुल बेनके व आमदार योगेश कदम यांच्या समवेत होते.

या शिवाय कॅम्ब्रिज विद्यापीठाला भेट दिली. तेथे साऊथ एशियन सोसायटीच्या चर्चा सत्रात त्यांनी सहभाग घेतला. या विद्यापीठात माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, राजीव गांधी, डॉ. मनमोहन सिंग या विद्यापीठात शिकले. तसेच महात्मा गांधींनी 1909 साली पहिल्यांदा आणि 1931 मध्ये दुसऱ्या गोलमेज परिषदेसाठी दुसऱ्यांदा केंब्रिज विद्यापीठाला भेट दिली होती. या भेटीचीही आठवण यावेळी निघाली. ट्रिनिटी कॉलेज तसंच महात्मा गांधींनी ज्या पेमब्रोक कॉलेजमध्ये पहिल्यांदा भाषण केलं तिथंही या दौऱ्यात रोहित पवार यांनी भेट दिली.

Rohit Pawar
'फडणवीस आणि राज ठाकरेंचे तरी ऐका; चंद्रकांतदादा वक्तव्य मागे घ्या!'

ते ब्रिटनमध्ये लंडन शहरात आयोजित केलेल्या आयडियल्स फॉर इंडिया या परिषदेला उपस्थित राहून चर्चेत सहभागी झाले. यावेळी त्यांना काँग्रेसचे नेते राहुल गांधी, सलमान खुर्शिद, भाकपचे नेते सीताराम येचुरी आदींची भेट घेतली. तसेच लंडनच्या ऐतिहासिक संसदेलाही त्यांनी यावेळी भेट दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in