...म्हणून रामदास आठवले घेणार मुख्यमंत्री ठाकरेंशी जुळवून

केंद्रीय मंत्री रामदास आठवले ( Ramdas Athavale ) यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी जुळवून घेणार असल्याचे सांगितले.
...म्हणून रामदास आठवले घेणार मुख्यमंत्री ठाकरेंशी जुळवून
Ramdas Athwale-Uddhav ThackearaySarkarnama

बोटा ( जि. अहमदनगर ) - भोजदरी (ता. संगमनेर) येथे शांतिदीप मित्रमंडळातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाचे आयोजन केले होते. या महोत्सवाला केंद्रीय मंत्री रामदास आठवले ( Ramdas Athavale ) उपस्थित होते. आठवले यांच्या खासदार निधीतून उभारण्यात आलेल्या सभामंडपाचे उद्‍घाटन करण्यात आले. या प्रसंगी बोलताना त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी जुळवून घेणार असल्याचे सांगितले. त्यामुळे राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या. ( ... so Ramdas Athavale by matching with Chief Minister Thackeray )

रामदास आठवले म्हणाले, गावाच्या विकासकामांत राजकारण आणू नका. शासकीय पातळीवर रस्तेबांधणीसाठी विविध योजना व निधीची तरतूद केली आहे. ग्रामस्थांना याची माहिती हवी. सध्या मुख्यमंत्र्यांशी जमत नाही, पण गावांच्या विकासासाठी त्यांच्याशी जुळवून घेऊ, अशी कोपरखळी आठवले यांनी मारली.

Ramdas Athwale-Uddhav Thackearay
Video: भीमा कोरेगाव दंगल ही जाणीवपूर्वक घडवली गेली;रामदास आठवले

आठवलेंच्या विचारांना पवारांचा पाठिंबा

सीमा आठवले म्हणाल्या, की भोजदरी गावातील सामाजिक एकोपा उल्लेखनीय आहे. मंत्री आठवले यांनी मांडलेल्या सर्वधर्मीय विचारांना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पाठिंबा दिला आहे. संविधानाशिवाय देश चालू शकत नाही, याची जाणीव सर्वांना हवी, असेही सीमा आठवले यांनी सांगितले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. किरण लहामटे, जनार्दन आहेर, बाळासाहेब गायकवाड, ज्ञानदेव मते, श्रीकांत भालेराव, संघराज रूपवते उपस्थित होते.

Ramdas Athwale-Uddhav Thackearay
शरद पवार यांना रामदास आठवले यांची उपपंतप्रधान पदाची आॅफर

आंबेडकरांचे तत्त्वज्ञान आग विझविणारे

मंत्री रामदास आठवले म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तत्त्वज्ञान आग विझविणारे आहे. त्यामुळे देशाला त्यांच्या तत्त्वज्ञानाची गरज आहे. निवडणुकीत प्रत्येक वेळेस उमेदवार जिंकतोच असे नाही. कधी पराभवही होतो. यावेळी कार्यकर्ते व जनता निवडून देणार असाल, तर शिर्डीत येतो, असे सांगायलाही ते विसरले नाहीत.

आठवलेंच्या कवितेची भुरळ

यावेळी मंत्री रामदास आठवले यांनी त्यांच्या शैलीत ‘भीमाचे योगदान लाल दिव्याच्या गाडीला... म्हणून आलोय मी भोजदरीला... अशी शिघ्र कविता सादर केली. तिला उपस्थितांनी भरभरून दाद दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.