म्हणून पंकजा आणि प्रीतम मुंडे यांनी मानले गडकरींचे भेटून आभार

रस्त्यांच्या कामांसाठी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी ( Nitin Gadkari ) यांनी निधी देत या कामाची निविदा काढली आहे.
Nitin Gadkari, Pankaja Munde, Pritam Munde
Nitin Gadkari, Pankaja Munde, Pritam MundeSarkarnama

बीड - बीड जिल्ह्यातील महामार्गांची दुरवस्ता पाहता हे रस्ते राष्ट्रीय महामार्गांकडे वर्ग व्हावेत यासाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे ( Pankaja Munde ) यांनी प्रयत्न केले होते. त्यानुसार जिल्ह्यातील चार रस्ते नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडियाकडे वर्ग करण्यात आले आहेत. तसेच या रस्त्यांच्या कामांसाठी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी ( Nitin Gadkari ) यांनी निधी देत या कामाची निविदा काढली आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील रस्त्यांचे रुपडे पालटणार आहे. So Pankaja and Pritam Munde thanked Gadkari for meeting him

बीड जिल्हयातील राष्ट्रीय महामार्गाच्या पूर्णत्वासाठी पंकजा मुंडे व खासदार डॉ. प्रितम मुंडे या सुरवातीपासून प्रयत्नशील आहेत, वेळोवेळी त्यांनी यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन पत्र देऊन पाठपुरावा केला होता, याच प्रयत्नांमुळे आता यासाठी निविदा निघाल्या आहेत. या कामांमुळे जिल्ह्याच्या विकासात मोठी भर पडणार आहे. या बद्दल पंकजा मुंडे व खासदार प्रितम मुंडे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट घेऊन त्यांचे आभार मानले.

Nitin Gadkari, Pankaja Munde, Pritam Munde
"लोकांनी भारतीय जनता पार्टीला पहिली पसंती दिलेली आहे", पंकजा मुंडे,पाहा व्हिडिओ

पंकजा मुंडे म्हणाल्या, केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्रालयाने जिल्हयात चार राष्ट्रीय महामार्गासाठीची निविदा प्रसिद्ध केली आहे. परळी - सिरसाळासह चार रस्त्यांसाठी 768 कोटीची ही निविदा आहे. लवकरच या रस्त्याच्या कामांना सुरवात होईल. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गामुळे जिल्हयाच्या विकासात मोठी भर पडणार आहे, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले.

Nitin Gadkari, Pankaja Munde, Pritam Munde
शरद पवार आणि नितीन गडकरी होणार डॉक्टर

नॅशनल हायवेने गुरूवारी या कामांच्या निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. परळी ते सिरसाळा हा रस्ता राष्ट्रीय महामार्गात समाविष्ट असून तसाच तो पुढे बीड पर्यंत असणार आहे. पहिल्या टप्प्यात यासाठी 235 कोटीची तरतूद आहे. हा रस्ता चौपदरी होणार आहे. या रस्त्यासह जिल्हयातील ज्या चार महामार्गाची निविदा प्रसिद्ध झाली आहे. त्यात साबलखेड- आष्टी - चिंचपूर- जामखेड 212 कोटी 70 लाख, जामखेड ते सौताडा 136 कोटी, शिरापूर/नवगन राजुरी जंक्शन ते शिवाजी चौक बीड आणि बार्शी नाका ते जरूड फाटा 184 कोटी 76 लाख अशी एकूण 768 कोटी 46 लाखाची ही कामे आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com