satara : इतके महाविकास पुरुष होता, तर साताऱ्यातील नागरिकांनी का नाकारले : शिवेंद्रसिंहराजे

Shivendraraje Bhosale उदयनराजेंच्या आरोपाला उत्तर देताना समोरासमोर या त्यांच्या आव्हानाची आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राजकीय खिल्ली उडवली आहे.
Shivendraraje Bhosale, Udayanraje Bhosale
Shivendraraje Bhosale, Udayanraje Bhosalesarkarnama

Satara News : 'मी मिशा काढीन किंवा मी भुवया काढीन...' उदयनराजे असले डायलॉग नेहमीचेच आहेत. आपण जर इतके महाविकास पुरुष होता, तर साताऱ्यातील नागरिकांनी आपल्याला का नाकारले, असे प्रतिउत्तर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले Shivendraraje Bhosale यांनी उदयनराजेंना Udayanraje Bhosale केले आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यात विविध विकास कामांचे नारळ फोडले, त्यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर त्यांनी अशा व्यक्ती राजघराण्यात का जन्माला येतात ? अशी सडकून टीका केली होती. गेले दोन दिवस सुरू झालेला दोन्ही राजांतील कलगीतुरा संपायला तयार नाही. उदयनराजेंच्या आरोपाला उत्तर देताना समोरासमोर या त्यांच्या आव्हानाची आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राजकीय खिल्ली उडवली आहे.

ते म्हणाले, सातारा विकास आघाडीचा भ्रष्ट कारभार सातारकरांनी गेल्या पाच वर्षात उघड्या डोळ्यांनी पाहिलेला आहे . विरोधी आघाडी म्हणून नगर विकास आघाडी आमची पालिकेत सक्रिय होती मात्र आम्ही काही बोलण्याच्या आधीच सत्ताधारी आघाडीच्या नगरसेवकांमधीलच भांडणे चव्हाट्यावर येत होती. तुझा चेक कितीचा माझा चेक कितीचा, तुला किती कमिशन मिळाले मला किती कमिशन मिळाले, हा कलगी तुरा साताऱ्याने पाहिला असून हे मी बोलत नाही हे यापूर्वीच वर्तमानपत्रांमध्ये छापून आले आहे.

Shivendraraje Bhosale, Udayanraje Bhosale
Satara News: अधिवेशन काळात ते कुठं असतात... शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंना डिवचले

उदयनराजे नेहमीच मी भुवया काढील मी मिशा काढील समोरासमोर या हे त्यांचे डायलॉग नेहमीचेच आहेत सातारकरांना याची सवय झाली आहे . प्रत्यक्षात ते त्यांचा शब्द कधीच पाळत नाहीत जर आपण इतके महाविकास पुरुष होता तर सातारकरांनी आपल्याला लोकसभेच्या पोट निवडणुकीत का नाकारले याचे उत्तर मात्र मिळत नाही .

Shivendraraje Bhosale, Udayanraje Bhosale
Satara Politics : जनतेचे प्रेम होते तर लोकसभेला पडलात कसे? शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंना डिवचलं..

भुयारी गटार योजना, पंतप्रधान आवास योजना असो पाणी योजना असो कोणतीही योजनाही पूर्ण झालेली नाही यामध्ये स्वतःच्या मर्जीतल्या ठेकेदारांना कामे देणे त्यामुळेच विकासाचे गाडे पुढे सरकलेले नाही . घंटागाडी निविदा प्रकरणांमध्ये वेतनाची ओढाताण झाल्यामुळे घंटागाडी चालक आत्महत्या करायला निघाले होते हे सुद्धा सातारकरांनी जवळून पाहिले आहे .त्यामुळे जर आव्हान दिले तर ते नक्कीच पाळावे असा प्रति टोला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उदयनराजे यांना लागला आहे

Shivendraraje Bhosale, Udayanraje Bhosale
Udayanraje Bhosale : खासदार उदयनराजे फुल फॉर्मात : गांधी टोपी घालून जिप्सी राईड; पाहा खास फोटो!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com