... मग मध्यप्रदेश काय पाकिस्तानमध्ये आहे काय? : आशिष शेलारांचा शरद पवारांना सवाल

आशिष शेलार ( Ashish Shelar ) यांनी ओबीसी आरक्षणाबाबत महाविकास आघाडीवर टीका केली.
Ashish Shelar
Ashish Shelarsarkarnama

अहमदनगर - भाजपचे नेते आशिष शेलार यांनी हे आज अहमदनगर दौऱ्यावर आहेत. त्यांनी पारनेरमध्ये जाऊन तेथील भाजप कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यानंतर उपस्थित पत्रकारांशी बोलताना आशिष शेलार ( Ashish Shelar ) यांनी ओबीसी आरक्षणाबाबत महाविकास आघाडीवर टीका केली. ( ... So is Madhya Pradesh in Pakistan? : Ashish Shelar's question to Sharad Pawar )

ओबीसी आरक्षणाबाबत भाजपने काढलेल्या मोर्चा बाबत आशिष शेलार म्हणाले की, आरक्षण सोडत 31 मे रोजी होत आहे. याचा अर्थ काय याला राज्य सरकारने उत्तर द्यावे. निवडणूक आयोग जर आपला कार्यक्रम पुढे घेऊन जात असेल ओबीसीच्या आरक्षणाला तिलांजली देत असेल तर राज्य सरकार गप्प का आहे. या गप्प होण्याच्या त्यांच्या वृत्तीचा अर्थ असा आहे की, हे राजकीय आरक्षण ओबीसी समाजाला मिळूच नये. हीच भावना महाविकास आघाडीची आहे, असा आरोप त्यांनी केला.

Ashish Shelar
आशिष शेलार म्हणाले, शिवसेनेकडे केवळ अधर्म राहिला...

ते पुढे म्हणाले की, मध्यप्रदेश सरकारने ओबीसी आरक्षणाबाबत पाठपुरावा केला. कायदेशीर ट्रिपल ट्रेसच्या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या. मग मध्यप्रदेशने जे केले ते महाराष्ट्राच्या सरकारला करताना त्यांचे हात बांधले होते का? हा जनआक्रोश आहे. या जनआक्रोशाचे प्रतिबिंब म्हणजे भाजपने काढलेला मोर्चा होता. आम्ही हा संघर्ष दुप्पट करू. निवडणुका ओबीसींच्या आरक्षणासह व्हाव्यात. यासाठी राज्य सरकारवर दबाव वाढवू, असा इशाराही त्यांनी दिला.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ओबीसी आरक्षणावरून केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली होती. या संदर्भात शेलार यांनी सांगितले की, शरद पवार यांना मध्यप्रदेश पाहता येत नाही काय? पवारांच्या दृष्टीने मग मध्यप्रदेश पाकिस्तानात आहे काय? त्यामुळे शरद पवार जे करू शकले नाहीत. ते दुसऱ्याने केले म्हंटल्यावर जळफळाटात खोटी विधाने करू नका, अशी टीका त्यांनी शरद पवार यांच्यावर केली.

Ashish Shelar
इंदोरीकर महाराज पडले आजारी : या तारखेपर्यंतची सर्व कीर्तने रद्द

शिवसेनेने हात आखडता घेतला

खासदार संभाजी महाराज यांच्या उमेदवारीवर विचारले असता त्यांनी स्पष्ट केले की, शिवसेनेने कोणाला उमेदवारी द्यावी हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. त्याच्यावर भाष्य करण्याचा आमचा अधिकार नाही कारण ती त्यांची पक्षांतर्गत बाब आहे. मात्र मुद्दा हा आहे की आमचे छत्रपती यांना सन्मानाचे काही देण्याची वेळ येते तेव्हा शिवसेनेचा हात आखडता का होतो? स्वपक्षाच्या विचारांसाठी संकुचित का होतो. हा प्रश्न आहे, कारण ही संधी भाजपला मिळाली आम्ही छत्रपतींचा सन्मान राष्ट्रपतींच्या वतीने त्यांना राज्यसभेवर नेमणूक करून दिली. मात्र ज्यावेळी ती संधी शिवसेनेकडे आली, त्यावेळी त्यांनी हात आखडता घेतला. वैचारिक संकुचितता दाखविली. हा काही छत्रपतींचा आदर केल्याचे मी मानत नाही, असे मत आशिष शेलार यांनी व्यक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com