Udayanraje Bhosale : तर माझ्या गाडीपुढे डॉल्बीची गाडी ठेऊन सगळीकडे फिरलो असतो...

उदयनराजे Udayanraje म्हणाले, डॉल्बीबाबत Dolby जे काय असेल ते कायद्याने about Low व न्यायालयाच्या निर्णयानुसारच Courts Decision होणार आहे.
MP Udayanraje Bhosale
MP Udayanraje Bhosalesarkarnama

सातारा : मुंबई, पुण्यात डॉल्बी लावल्या जातात मग साताऱ्यातच का अडविले जातंय, या प्रश्नावर साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, तसं असतं तर माझ्या गाडीच्या पुढे डॉल्बीची गाडी ठेवली असती आणि सगळीकडे फिरलो असतो. यातील गंमतीचा भाग सोडला तर ध्वनीप्रदुषणाचाही विचार आपण केला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात कास परिसरातील व्यावसायिकांनी आज खासदार उदयनराजे भोसले यांच्यासोबत जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. यानंतर उदयनराजेंनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी डॉल्बीच्या मुद्द्यावरील पत्रकारांच्या विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली.

MP Udayanraje Bhosale
Satara : डाॅल्बी वाजलीच पाहिजे... दोन तासांत काय आभाळ कोसळणार का... उदयनराजे भडकले

खासदार उदयनराजे म्हणाले, डॉल्बीबाबत जे काय असेल ते कायद्याने व न्यायालयाच्या निर्णयानुसारच होणार आहे. मुंबई, पुण्यात डॉल्बी लावल्या जातात. मग साताऱ्यात का अडविले जाते. कारण येथे महाराज आहेत म्हणून का, या प्रश्नावर उदयनराजे म्हणाले, तसं असतं तर डॉल्बीची गाडी माझ्या गाडीच्या पुढे ठेवली असती आणि सगळीकडे फिरलो असतो. पण, येथे ध्वनी प्रदुषणाचा ही विचार केला पाहिजे.

MP Udayanraje Bhosale
Udayanraje Bhosale : जेव्हा उदयनराजे स्वतःच सांगतात खरी गोष्ट...

मुळात ज्यांनी डॉल्बी सिस्टीम विकत घेतल्या आहेत, त्या शासनाने विकत घ्याव्यात, म्हणजे त्यांचा प्रश्न सुटेल.ज्यावेळी एखादी मोठी राजकिय सभा असते. त्यावेळी मोठ्याने स्पीकर लावल्याशिवाय शेवटच्या माणसाला भाषण ऐकू जात नाही. पण, त्या सभेत आपण बोलतो आणि डॉल्बीवर गाणी लावली जातात एवढाच फरक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com