'...म्हणून मला मंत्रिपद मिळाले नाही'

माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा ( Pankaja Munde ) विधानसभा निवडणुकीतील पराभव व खासदार डॉ. प्रीतम मुंडे ( Dr. Pritam Munde ) यांना मंत्रिपद न मिळाल्याने समर्थकांत मोठी नाराजी आहे.
Pritam munde.jpg
Pritam munde.jpgsarkarnama

पाथर्डी ( अहमदनगर ) : भाजपचे ज्येष्ठ नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या दोन्ही कन्यांवर भाजपकडूनच अन्याय होत असल्याची भावना त्यांच्या समर्थकांत आहे. माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा विधानसभा निवडणुकीतील पराभव व खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्याने समर्थकांत मोठी नाराजी आहे. यावर डॉ. प्रीतम मुंडे यांनी आज पाथर्डी येथे महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. '... so I didn't get the ministry post'

भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल गर्जे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्‍घाटन मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. या वेळी आमदार मोनिका राजळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, गोकुळ दौंड, अशोक गर्जे, बीड जिल्हा परिषदेचे सदस्य रामराव खेडकर, विजय गोल्हार उपस्थित होते.

Pritam munde.jpg
केंद्रीय मंत्रिपदासाठी प्रीतम मुंडे योग्य होत्या; पंकजा मुंडेंच्या मनातील खदखद बाहेर 

डॉ. प्रीतम मुंडे म्हणाल्या, मंत्रिपदाच्या शर्यतीत मी कधीच नव्हते. त्यामुळे मला मंत्रिपद मिळाले नाही म्हणून तुम्ही नाराज होऊ नका. माझ्या दृष्टीने तुमचे आशीर्वाद महत्त्वाचे आहेत. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी स्वाभिमानाने कसे जगायचे, याची शिकवण आपल्या सर्वांना दिली आहे. त्यांची मुलगी असल्याचा मला अभिमान आहे. राजकारणात आपण अपार कष्ट घेणार असून, ये तो बस झाकी है, दिल्ली अभी बाकी है, असे खासदार प्रीतम मुंडे यांनी सांगितले.

Pritam munde.jpg
प्रीतम मुंडेंच्या मंत्रिपदाबाबत पंकजा मुंडे यांनी केले भाष्य 

मुंडे पुढे म्हणाल्या, पाथर्डी तालुक्यास दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे मावशी म्हणत. त्या नात्याने पाथर्डी माझी आजी आहे. तुमच्याकडून मला काकणभर जास्त मायेची गरज आहे. तुमचे आशीर्वाद मला मतदानातून मिळत नाही, ही खंत आहे. या तालुक्याचा समावेश जर बीड लोकसभा मतदारसंघात झाला असता, तर मला अधिक आनंद झाला असता. गर्जे यांनी तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवावेत, असेही मुंडे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com