
-रुपेश कदम
Maan Congress News : माण, खटाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी दहिवडीतील फलटण चौकात युवक काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, समविचारी पक्षांनी रास्ता रोको केला. यावेळी 'भाजप सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय', 'युवक काँग्रेस जिंदाबाद, नरेंद्र मोदी मुर्दाबाद', 'शेतकर्यांना न्याय मिळालाच पाहिजे' अशी घोषणाबाजी करणाऱ्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली. त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी प्रशासनाचाही निषेध नोंदवला.
सत्तेच्या व खुर्चीच्या हव्यासाने दंग झालेले महाराष्ट्रातील भावनाशून्य व बेकायदेशीर सरकार लोकांच्या सहनशीलतेची वाट लावण्यासाठीच सत्तेवर बसले आहे का, असा प्रश्न करत या सरकारला जागे करण्यासाठी आज युवक काँग्रेस Youth Congress, स्वाभिमानी शेतकरी संघटना, समविचारी पक्ष आणि शेतकऱ्यांच्या उपस्थितीत दहिवडीतील Dahiwadi फलटण चौकात रस्ता रोको आंदोलन झाले.
या आंदोलनात अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे सदस्य रणजितसिंह देशमुख, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी उदयभानू चिंब, सहप्रभारी एहसान खान, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, उपाध्यक्ष शिवराज मोरे, युवकचे जिल्हाध्यक्ष अमरजित कांबळे, एम. के. भोसले, महेश गुरव, संदीप सजगणे, बाबासाहेब माने, डाॅ. संतोष गोडसे, विजयराव शिंदे, योगेश भोसले, नकुसा जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी माण व खटाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा. जनावरांसाठी चारा पाण्याची सोय करावी. उरमोडीचे व तारळीचे पाणी मोफत सोडावे. टंचाईग्रस्त गावांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी ट्रँकर चालू करावेत, यासाठी फिडिंग पॉईंट तयार करावेत. पिंगळी व येरळवाडीसह सर्व पाझर तलाव व छोटे मोठे तलाव भरावेत.
खरीप हंगाम वाया गेल्याने त्याची नुकसान भरपाई मिळावी. पिक कर्ज माफ करावे. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान त्वरीत मिळावे. कांद्यावरील ४०% निर्यात शुल्क रद्द करावे आदी मागण्या करण्यात आल्या.
यावेळी 'भाजप सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय', 'युवक काँग्रेस जिंदाबाद, नरेंद्र मोदी मुर्दाबाद', 'शेतकर्यांना न्याय मिळालाच पाहिजे' अशी घोषणाबाजी करणाऱ्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली. त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी प्रशासनाचाही निषेध नोंदवला.
Edited By : Umesh Bambare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.