नगर अर्बन बॅंक निवडणुकीसाठी गांधीच्या सहकार पॅनलकडून सहा उमेदवारी अर्ज दाखल

आर्थिक गैरव्यवहारांच्या प्रकरणांमुळे राज्यभर चर्चेत आलेल्या नगर अर्बन बॅंकेवर ( Nagar Urban Bank ) रिझर्व्ह बँकेने ( RBI ) प्रशासक नियुक्त केले होते.
Nagar Urban Bank
Nagar Urban BankSarkarnama

अहमदनगर : आर्थिक गैरव्यवहारांच्या प्रकरणांमुळे राज्यभर चर्चेत आलेल्या नगर अर्बन बॅंकेवर रिझर्व्ह बँकेने प्रशासक नियुक्त केले होते. या बँकेची निवडणूक जिल्हा उपनिबंधकांनी जाहीर केली असून आज या निवडणूक प्रक्रियेतील उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा पहिलाच दिवस होता. यात अहमदनगरचे माजी खासदार स्वर्गीय दिलीप गांधी प्रणीत सहकार पॅनलकडून सहा उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आले. Six nomination papers filed by Gandhi's co-operation panel for Nagar Urban Bank elections

नगर अर्बन बँकेत 19 संचालक असणार आहेत. अर्ज दाखल करण्याच्या आजच्या पहिल्याच दिवशी शहर मतदार संघातून सर्वसाधारण गटातून सहा उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यात बँकेचे माजी संचालक अनिल कोठारी, राजेंद्र अग्रवाल यांच्या सह ईश्वर बोरा, राहुल जामगावकर, संपत बोरा तसेच माजी संचालक दीपक गांधी यांच्या पत्नी संगीता गांधी यांनी महिला राखीव मतदार संघातून उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्या कडे दाखल केले आहेत.

Nagar Urban Bank
नगर अर्बन बॅंक सोनेतारण गैरव्यवहार ! शेवगावच्या शाखा व्यवस्थापकाची आत्महत्या

दिलीप गांधी यांचे पूत्र सुवेंद्र गांधी म्हणाले, सहकार पॅनल पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढवत आहे. सर्वच्या सर्व जागांवर दिग्गज व नावलौकिक असलेले उमेदवार देत आहे. सरोज गांधी यांच्या नेतृत्वाखाली मतदारांच्या भेटी घेत प्रचार सुरु केला आहे.

यावेळी नगरसेवक राहुल कांबळे, मनोज कोतकर, माजी संचालक दीपक गांधी, शैलेश मुनोत, आदेश कोठारी, मर्चंट बँकेचे संचालक कमलेश भंडारी, अमित मुथा, वसंत बोरा, अजय चितळे, रोषण गांधी, मल्हारी दराडे आदी उपस्थित होते.

Nagar Urban Bank
नगर अर्बन बँकेच्या निवडणुकीचा वाजला बिगुल

बँकेत काय झाले होते

गैरव्यवहारामुळे नगर अर्बन बँक गेल्या काही वर्षांपासून चर्चेचा विषय राहिली आहे. बँकेतील गैरव्यवहाराबाबत पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. 2019 मध्ये या बँकेची निवडणूक अपेक्षित होती. मात्र, बँकेचा एनपीए वाढल्यामुळे रिझर्व्ह बँकेने संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती केली होती. बँकेवर सुमारे दोन वर्षांपासून प्रशासकच काम पाहत आहेत.

निवडणुकीचा कार्यक्रम

जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार 28 नोव्हेंबरला मतदान होणार असून, 30 नोव्हेंबरला मतमोजणी केली जाणार आहे. निवडणुकीचा अधिकृत निकाल 1 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता जाहीर केला जाईल. बँकेच्या 18 जागा असून, त्यासाठी उमेदवारी अर्ज विक्री व स्वीकृतीसाठी 26 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबरपर्यंतची मुदत आहे. 3 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. वैध उमेदवारी अर्जांची यादी 8 नोव्हेंबरला प्रसिद्ध केली जाणार असून, 15 नोव्हेंबरला उमेदवारांना चिन्हांचे वाटप केले जाणार आहे.

बँकेच्या मागील निवडणुकीचा आढावा

बँकेच्या संचालक मंडळाची यापूर्वी 2014 मध्ये निवडणूक झाली होती. या निवडणुकीत 48 हजार मतदार होते. माजी खासदार दिवंगत दिलीप गांधी व दिवंगत सुवालाल गुंदेचा यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनल तसेच सुभाष भंडारी व राजेंद्र गांधी यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा पॅनल यांच्यात लढत झाली होती. या निवडणुकीत गांधी व गुंदेचा यांच्या पॅनलने बँकेवर एकहाती सत्ता मिळविली होती. आताच्या मतदार यादीत 55 हजार 991 मतदार आहेत. ही वाढलेली मते या निवडणुकीत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com