मंगळवेढा उपसा सिंचन योजनेसाठी आता सिद्धेश्वर आवताडे मैदानात!

या योजनेसाठी माझ्या पाठीमागे येण्यापेक्षा माझ्या बरोबरीने यावे, असे आवाहन सिद्धेश्वर आवताडे यांनी केले आहे.
Siddheshwar Avtade

Siddheshwar Avtade

sarkarnama

मंगळवेढा (जि. सोलापूर) : बहुचर्चित मंगळवेढा उपसा सिंचन योजनेसाठी आता सोलापूर जिल्हा बॅंकेचे (Solapur District Bank) संचालक बबनराव आवताडे यांचे चिरंजीव तथा मंगळवेढा खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे मैदानात उतरले आहेत. या योजनेसाठी माझ्या पाठीमागे येण्यापेक्षा माझ्या बरोबरीने यावे. या पाणीप्रश्नावर आपण मोठे जनआंदोलन उभे करू, अशी भूमिका सिद्धेश्वर आवताडे (Siddheshwar Avtade) यांनी मांडली. (Siddheshwar Avtade will now agitate for Mangalvedha Upsa Irrigation Scheme)

मंगळवेढा तालुक्यातील भाळवणी येथील कार्यक्रमात सिद्धेश्वर आवताडे बोलत होते. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या आखाड्यामध्ये अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राज्याच्या राजकारणामध्ये सिद्धेश्वर आवताडे चर्चेत आले होते. त्या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर त्यांनी आपला जनसंपर्क पूर्वीपेक्षा अधिक पटीने वाढला आहे. त्यामुळे ते मंगळवेढा तालुक्याच्या राजकारणामध्ये चर्चेत आहेत.

Siddheshwar Avtade

निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर दरेकरांनी घेतले फडणवीसांचे आशीर्वाद अन्‌ म्हणाले...

मंगळवेढा उपसा सिंचन योजनेसाठी (स्व.) आमदार भारत भालके यांनी 2009 पासून प्रयत्न केले. या योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पण भाजपचे सरकार आल्यानंतर या योजनेत अडथळे आणले गेले. या योजनेसाठीचे पाणी व गावे कमी करण्यात आली. पण, २०१९ मध्ये राज्यातील सत्ताबदलात आमदार भालके यांनी या योजनेतील पाणी व गावे कायम ठेवण्यात यश मिळवले होते. पण, त्यांच्या अकाली निधनामुळे या योजनेच्या कामात खंड पडला आहे.

Siddheshwar Avtade

शंभूराज देसाईंनी निष्ठावंत कार्यकर्त्याला दिली नववर्षाची अनोखी भेट!

नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी या योजनेचा प्रश्न मार्गी लावण्याचे सूतोवाच केले आहे. पण, पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार भगिरथ भालके यांच्या पराभवानंतर तालुक्यातील राष्ट्रवादीत गटबाजी वाढली आहे. ही गटबाजी पाहता मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या प्रलंबित प्रश्नासाठी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा कोण करणार,असा प्रश्न निर्माण झाले आहे.

Siddheshwar Avtade

दोन वर्षांनंतर राजकीय आखाड्यात उतरलेल्या पाचर्णेंनी उभे केले पवारांपुढे कडवे आव्हान

पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला विजय केल्यास या भागाच्या पाणीप्रश्नासाठी केंद्रातून निधी आणण्याची घोषणा प्रचार सभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती, त्यामुळे हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष या योजनेवर बोलतील, अशी अपेक्षा मंगळवेढ्यातील जनतेला होती. मात्र, त्याबाबत दोन्ही बाजूकडून हात घातला गेला नाही. त्यामुळे या योजनेला मुहूर्त कधी लागणार, याची चर्चा तालुक्यात सुरू असतानाच खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे यांच्या नव्या भूमिकेमुळे तालुक्यात हा प्रश्न चर्चेला आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com