रस्ते सुरक्षा जनजागृतीसाठी गेलेल्या तरुणीचा अपघाती मृत्यू...

नवरात्रोत्सवानिमित्त दुचाकीवरून साडेतीन शक्तिपीठाची यात्रा करून महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर व रस्ते सुरक्षा विषयी जागृती करण्यासाठी हिरकणी ग्रुपने ही मोहिम हाती घेतली होती.
रस्ते सुरक्षा जनजागृतीसाठी गेलेल्या तरुणीचा अपघाती मृत्यू...
Hirkani Group, Shubhangi Pawarfacebook

नांदेड : नवरात्रोत्सव निमित्ताने दुचाकीवरून साडेतीन शक्तिपीठाची यात्रा करून महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर विषयी जनजागृती व्हावी व रस्ते सुरक्षा विषयी माहिती देण्यासाठी निघालेल्या सातारच्या हिरकणी महिला रायडर्स ग्रुप मधील महिला सदस्या शुभांगी पवार (रा. सातारा) यांच्या दुचाकीला नांदेड -अर्धापूर रस्त्यावरील भोकर फाटा परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अपघात झाला. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

हा अपघात मंगळवारी सकाळी ( ता १२) सकाळी साडे नऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास झाला. ट्रक चालकास अर्धापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सातारा येथील हिरकणी महिला रायडर्स ग्रुपच्या वतीने नवरात्रोत्सव निमित्ताने साडे तीन शक्तिपीठाची दुचाकीवरून दर्शन यात्रा करून महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर व रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी त्यांनी ही मोहिम हाती घेतली होती.

Hirkani Group, Shubhangi Pawar
सातारा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला हे न पटणारे; भाजप पालिका स्वबळावर लढणार 

या यात्रेला रविवारी (ता. दहा) साताऱ्यातून सुरुवात झाली. ही यात्रा कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूर गडची रेणुका, वणीची सप्तश्रृंगी या साडेतीन शक्तिपीठाची ह़ोणार होती. ही यात्रा दहा जिल्हे, २५ तालुके, एक हजार ८६८ किलो मीटर प्रवास करुन शुक्रवारी (ता १५) सातारा येथे तिची सांगता होणार होती. ग्रुप प्रमुख मनिषा फरांदे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या यात्रेत शुभांगी पवार, अंजली शिंदे, मोनिका निकम (जगताप), अर्चना कुकडे, केतकी चव्हाण, ज्योती दुबे, श्रावणी बॅनर्जी, भाग्यश्री केळकर यांचा समावेश होता.

Hirkani Group, Shubhangi Pawar
रामराजेंच्या भेटीवर उदयनराजे म्हणाले, माझा कोणीही.....

या यात्रेला सातारा येथील पोवईनाका परिसरातील शिवतीर्थपासून छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थित प्रारंभ झाला होता. ही यात्रा कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेऊन तुळजापूरची तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन नांदेड मार्गे माहुरला जात होती. सात दुचाकी नांदेड मार्गे माहुरला जात असताना भोकरफाट परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शुभांगी संभाजी पवार (वय ४२ रा सातारा) यांच्या दुचाकीला (एम .एच११ सी ए १४४७) भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने (जी जे १२ एक टी ६९५७) धडक दिली. यात शुभांगी पवार यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात शुभांगी पवार यांच्या मृत्यूमुळे या यात्रेत सहभागी झालेल्या महिलांनी एकच टाहो फोडला. त्या़ंना अश्रू अनावर झाले होते.अर्धापूर पोलिसांनी ट्रक चालकास ताब्यात घेतले आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in