UPSC Results : पतीपासून प्रेरणा अन् तिसऱ्या प्रयत्नांत यूपीएससी उत्तीर्ण; करमाळ्याच्या केकान यांचं यश

UPSC Civil Services Result 2023 Declared : ...म्हणून लग्नानंतर स्पर्धा परीक्षा द्यायचा निर्णय घेतला!
UPSC Results
UPSC Results Sarkarmama

अण्णा काळे

Karmala : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा २०२२ चा निकाल मंगळवारी(दि.२३) दुपारी जाहीर झाला. या निकालात पुन्हा एकदा मुलींचा वरचष्मा पाहायला मिळाला. तसेच महाराष्ट्रातील ८५ जणांनी या निकालात यशाला गवसणी घातली आहे. त्यात पतीपासून प्रेरणा घेत करमाळा तालुक्यातील वंजारवाडी येथील शुभांगी केकान या केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. त्या 530 क्रमांक रँकने ही परीक्षा झाल्या आहेत.

शुभांगी केकान (Shubham Kekan) यांनी लग्नानंतर स्पर्धा परीक्षा द्यायचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी केली. बीडीए झाल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस करमाळा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांनी प्रॅक्टिस केली आहे. नंतर प्रॅक्टिस सोडून पूर्णवेळ स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. तिसऱ्या प्रयत्नात त्यांनाही यश मिळालं आहे. त्यांचे वडील सुदर्शन केकान हे प्राथमिक शिक्षक होते. मार्च 2023 मध्ये सुदर्शन केकान हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोंधवडी (ता. करमाळा) येथून सेवानिवृत्त झाले आहेत.

UPSC Results
UPSC Result : 'युपीएससी'त 'सारथी'चे यश ; 17 उमेदवार प्रशासकीय सेवेसाठी सज्ज !

यूपीएससी(UPSC) परीक्षेत यश मिळवलेल्या शुभांगी केकान या विवाहित आहेत. त्यांचे सासर करमाळा तालुक्यातील शेलगाव (वा) हे आहे. त्यांचे पती ओंकार पोटे हे नगर येथे हे स्टेट बँकेत मॅनेजर कार्यरत आहेत. त्यांनी घरी राहून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला आहे. त्यांना सहा वर्षाचा शिवम नावाचा मुलगा आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

UPSC Results
Rahul Gandhi News : नवा वाद ; काँग्रेसकडून राहुल गांधींची थेट छत्रपती शिवरायांशी तुलना..? काय आहे प्रकरण?

...तर कुठलीही परीक्षा यशस्वी होऊ शकतो

या यशाबद्दल केकान म्हणाल्या, माझे पती स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून बँकेत अधिकारी झाले आहेत .लग्न झाल्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केलेला असल्यामुळे मला स्पर्धा परीक्षा करण्याचे प्रेरणा मिळाली. त्यातून मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. ही परीक्षा देत असताना मला माझे आई-वडील सासू-सासरे आणि पती यांनी मोलाची साथ दिली. घरात लहान मुलगा असल्यानं त्या मुलाकडे देखील मला लक्ष द्यावे लागत होते. मात्र, जर आपल्या मनात जिद्द असेल तर आपण नक्कीच कुठलीही परीक्षा सहजपणे यशस्वी होऊ शकतो असंही केकान म्हणाल्या.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com