Shrigonda APMC Election : पाचपुतेंचं 'होमपिच' असलेल्या श्रीगोंदा बाजार समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीचे लोखंडे

Ahmednagar Politics : सभापती पदी अतुल लोखंडे तर उपसभापती पदी मनिषा मगर
Rahul Jagtap
Rahul JagtapSarkarnama

Ahmednagar Political News : श्रीगोंदा बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राहुल जगताप यांच्या गटाने १८ पैकी ११ जागा जिंकल्या. तर काँगेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे आणि भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांच्या पॅनलला फक्त सात जागांवर समाधान मानावे लागले. यानंतरही सभापती आणि उपसभापदी पद मिळविण्यासाठी दोन्ही गटांत मोठ्या प्रमाणात रस्सीखेच झाली. या शह-कटशहच्या राजकारणानंतर सभापदी आणि उपसभापदी या दोन्ही पदांची माळ राष्ट्रवादी काँग्रेस गटातील उमेदवारांच्या गळ्यात पडली आहे.

Rahul Jagtap
Beed Bjp District President News : भाजप जिल्हाध्यक्ष बदलणार ? की मग पुन्हा म्हस्केंच्याच गळ्यात माळ..

राज्यात नेतृत्व करणारे बबनराव पाचपुते (Babanrao Pachpute) आणि नागवडे एकत्र येऊन राहुल जगताप यांच्याविरोधात पॅनलची स्थापन केली. या पॅनेलच्या माध्यमातून तालुक्यात जगताप यांना धक्का देण्याची पाचपुते यांची रणनिती होती. त्यातून श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक चुरशीची बनली होती. मात्र या निवडणुकीमध्ये राहुल जगताप यांनी पाचपुते-नागवडे गटाला चितपट केले. जगताप गटाने तब्बल ११ उमेदवार निवडून आणले. तर नागवडे पाचपुते गटाला सात जागा मिळाल्या.

श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत नागवडे-पाचपुते यांनी एकत्र येऊन माजी आमदार राहुल जगताप (Rahul Jagtap) यांच्या विरोधात बंड केले होते. जगतापांनी मात्र नागवडे-पाचपुते गटाला चांगलीच धूळ चारली. दरम्यान, सभापती, उपसभापती पदासाठी दोन्ही गटातील अनेक उमेदवारांनी गुडघ्याला बाशिंग बांधले होते. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलकडून अतुल लोखंडे आणि साजन पाचपुते यांचे नाव आघाडीवर होती.

Rahul Jagtap
Akola APMC : राष्ट्रवादीचे वर्चस्व, धोत्रे गटाने राखली ४० वर्षांपासूनची सहकारातील सत्ता !

दरम्यान, गुरुवारी (ता. १८) सभापती आणि उपसभापती निवडणुकीचा कार्यक्रम पार पडला. उमेदवारी अर्ज स्विकृतीनंतर त्या अर्जांची छाननी करण्यात आली. सभापतीपदासाठी जगताप गटाकडून अतुल लक्ष्मण लोखंडे व नागवडे-पाचपुते गटाकडून प्रशांत दत्तात्रय उगले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. तर उपसभापती पदासाठी जगताप गटाकडून मनिषा योगेश मगर तर नागवडे-पाचपुते गटाकडून लक्ष्मण विठ्ठल नलगे यांचे अर्ज दाखल झाले.

यावेळी सभापती आणि उपसभापती पदासाठी चुरशीची लढत झाली. सभापतीपदाच्या निवडीत लोखंडे यांना १० तर उगले यांना ८ मते मिळाली. तर उपसभापती पदाच्या निवडणुकीमध्ये मनिषा मगर विजयी झाल्या. सभापती, उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाल्याने निवडीनंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करत गुलालाची उधळण केली.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in