साईनामाच्या गजरात शिर्डीत श्रीरामनवमी उत्सवास प्रारंभ

कोरोना संकटामुळे दोन वर्षे होऊ न शकलेला शिर्डीतील श्रीरामनवमी उत्सव काल (शनिवार) पासून मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे.
Shri Ram Navami celebrations begin in Shirdi
Shri Ram Navami celebrations begin in ShirdiSarkarnama

शिर्डी ( जि. अहमदनगर ) - कोरोना संकटामुळे दोन वर्षे होऊ न शकलेला शिर्डीतील श्रीरामनवमी उत्सव काल (शनिवार) पासून मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे. या उत्सवासाठी देश, विदेशातील भाविक शिर्डी परिसरात दाखल झाले आहेत. ( Shri Ram Navami celebrations begin in Shirdi with the sound of Sainama )

साईबाबांनी आपल्या हयातीत सुरू केलेल्या श्रीरामनवमी उत्सवास काल (शनिवारी) उत्साहात प्रारंभ झाला. रणरणत्या उन्हाची पर्वा न करता साईंच्या पालख्या खांद्यावर घेऊन, साईनामाचा गजर करीत बाबांच्या नगरीत दाखल झालेले शेकडो मुंबईकर पदयात्री... यात्रा समितीच्या वतीने कपाळी गंध लावून त्यांचे करण्यात आलेले अनोखे स्वागत... साईसंस्थानच्या वतीने साईसमाधी मंदिरात करण्यात आलेली रंगीबेरंगी फुलांची सजावट आणि कळसावरची आकर्षक विद्युत रोषणाई... हे यंदाच्या उत्सवाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

Shri Ram Navami celebrations begin in Shirdi
Video : शिर्डी नगरपंचायतीचे अखेर नगरपरिषदेमध्ये रूपांतर

आज पहाटे साईमंदिरातून साईंची पोथी व प्रतिमेच्या छोटेखानी मिरवणुकीने उत्सवास प्रारंभ झाला. साईसंस्थानचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे, त्यांच्या पत्नी चैताली काळे, उपाध्यक्ष अॅड. जगदीश सावंत, विश्वस्त सुरेश वाबळे, महेंद्र शेळके, डॉ. एकनाथ गोंदकर अविनाश दंडवते, सचिन गुजर, राहुल कनाल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब शिंदे आदी या मिरवणुकीत सहभागी झाले. ही मिरवणूक द्वारकामाईत गेल्यानंतर तेथे साईचरित्र अखंड पारायण सोहळ्यास प्रारंभ झाला.

सकाळी सातच्या सुमारास साईसंस्थानचे अध्यक्ष आमदार काळे यांनी साईसमाधीची सपत्नीक पाद्यपूजा केली. गेल्या तीस वर्षांपासून मुंबईतील द्वारकामाई मंडळाचे सजावटकार साईमंदिर परिसरात आकर्षक देखावा व महाद्वाराची उभारणी करतात. या कलाकृती उत्सवात सहभागी झालेल्या भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडतात. यंदा हा देखावा उभारण्यात आलेला नाही.

Shri Ram Navami celebrations begin in Shirdi
असा झाला सदाशिव लोखंडेंचा चेंबूर ते शिर्डी राजकीय प्रवास

मुंबईसह राज्याच्या विविध भागातून पन्नास हजारांहून अधिक पदयात्री भाविक साईंच्या पालख्या घेऊन शिर्डीत दाखल झाले. यात्रा समिती व ग्रामस्थांच्या वतीने त्यांच्या कपाळी गंध लावून स्वागत करण्यात आले. साईसमाधी मंदिराच्या पूर्वेला महंत रामगिरी महाराजांच्या हस्ते व साईसंस्थानचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. माजी उपनगराध्यक्ष अभय शेळके यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम संपन्न झाला. एक एकर क्षेत्रात रांगोळी रेखाटून साकारण्यात आलेली साईबाबांची प्रतिमा उद्या भाविकांना पहाण्यासाठी खुली केली जाईल.

- कमलाकर कोते, अध्यक्ष, श्रीरामनवमी यात्रा समिती, शिर्डी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com