खासदार संभाजी राजेंच्या अवमान प्रकरणी दोन जणांना कारणे दाखवा नोटीस

तुळजाभवानी मंदिरात खासदार संभाजी राजे ( Sambhaji Raje ) हे दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी त्यांचा अवमान झाल्याचा आरोप करण्यात आला.
Tulja bhavani mandir
Tulja bhavani mandirSarkarnama

उस्मानाबाद - तुळजाभवानी मंदिरात खासदार संभाजी राजे ( Chhatrapati Sambhaji Raje ) हे दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी त्यांचा अवमान झाल्याचा आरोप करण्यात आला. यावरून उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी अविनाश कोरडे यांनी दोन जणांवर कारवाई का करू नये याबाबत कारणे दाखवा नोटीस दिली आहे. ( Show cause notice to two persons in case of contempt of MP Sambhaji Raje )

तुळजाभवानी मंदिरात खासदार संभाजीराजे यांच्या अवमान प्रकरणी मंदिर तहसीलदार योगिता कोल्हे व सहायक धार्मिक व्यवस्थापक नागेश शितोळे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे आपल्यावर प्रशासकीय कारवाई का करण्यात येऊ नये ? असे नोटिसीत नमूद केले असून यांच्यावर कारवाई साठी तुळजापूरकर चांगलेच आक्रमक झाले आहेत. खासदार संभाजीराजे यांच्या अवमान प्रकरणी कारवाईसाठी तुळजापूरकरांनी बंद ठेवला आहे.

Tulja bhavani mandir
Video: राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार- संभाजीराजे

खासदार संभाजीराजे यांना तुळजापूर मंदिर संस्थानकडून गाभाऱ्यात दर्शन देण्यासाठी अडवल्याने गावकरी संतप्त झाले आहेत. दरम्यान संभाजीराजेंनी स्वतः जिल्हाधिकारी यांना फोन करून जिल्हाधिकारी यांना सुनावले होते. छत्रपती घराण्यातील कोणतेही सदस्य जेव्हा तुळजाई नगरीतील भवानी मातेच्या दर्शनास येतात. तेव्हा ते थेट गाभाऱ्यात जाऊन विधिवत मातेचे दर्शन घेतात, मात्र शेकडो वर्षांची परंपरा खंडित झाल्याने खासदार संभाजीराजे नाराज झाले होते. याप्रकरणी मंदिर संस्थांनने परिपत्रक काढत दिलगिरी व्यक्त केली, मात्र तरी देखील नागरिक तहसीलदार आणि व्यवस्थापक यांच्यावर कारवाईच्या मागणीवर ठाम आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com