Gokul Dudh Sangh : सतेज पाटलांमध्ये प्रश्नांची उत्तरे देण्याची हिंमत नाही; शौमिका महाडिकांचा घणाघात

Shoumika Mahadik Vs Satej Patil : सभास्थळी सभासदांची दोन किलोमीटर रांग
Satej Patil, Shoumika Mahadik
Satej Patil, Shoumika MahadikSarkarnama

Kolhapur Political News : गोकुळच्या सत्ताधारी आणि कारभाऱ्यांना ही सभा होऊच द्यायची नव्हती. सभेसाठी अनेक बोगस सभासद बनवून गर्दी केली आहे. खरे सभासद बाहेरच आहेत, असा गंभीर आरोप करून माजी मंत्री सतेज पाटलांमध्ये आमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याची हिंमत नाही, असा घणाघात संचालिका शौमिका महाडिकांनी केला. (Latest Political News)

गोकुळची (Gokul) सर्वसाधारण सभा शुक्रवारी पार पडली असून ती अनेक कारणांनी वादळी ठरली. सभास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. सभासदांना पाण्याची बाटलीही सोबत नेण्यास परवानगी नव्हती. 'ओळखपत्रांची तपासणी करूनच सभासदांना आतमध्ये सोडले जात होते. त्यासाठी एक रांग केली होती, ती दोन किलोमिटरपर्यंत लागली होती. असा प्रकार यापूर्वी कधीच झाला नव्हता. मी रांगेतील सभासदांशी बोलले असून ते खरे सभासद आहेत. सभेला निम्म्याहून अधिक सभासद बोगस होते. सतेज पाटलांमध्ये (Satej Patil) आमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याची हिंमतच नसल्याने असे प्रकार करण्यात आले,' असा आरोप महाडिकांनी केला.

Satej Patil, Shoumika Mahadik
MLA Disqualification Hearing : भंडाऱ्याचे अपक्ष आमदार भोंडेकर स्वतःचा वकील नेमणार !

गोकुळच्या सभेपूर्वी महिनाभर (Shoumika Mahadik) शौमिका महाडिकांनी कोल्हापूर दौरा केला होता. त्यावेळी सभासदांशी चर्चा करून त्यांच्यावतीने काही प्रश्न गोकुळच्या सत्ताधाऱ्यांना विचारणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे या सभेकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. सभेत मात्र महाडिकांना बोलूच दिले नसल्याचा आरोप करण्यात आला. यामुळे आपण समांतर सभा घेणार असल्याचे शौमिका महाडिकांनी जाहीर केले.

यावर 'सभेत सभासदांनी प्रश्न विचारयचे असतात, तर संचालकांनी बोर्डात विचारायचे असतात,' असे उत्तर गोकुळचे चेअरमन अरूण डोंगळेंनी दिले. महाडिकांनी दिलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रास्ताविकात दिल्याचे चेअरमन डोंगळे यांनी सांगितले. तर सतेज पाटलांवर केलेल्या आरोपांवर बोलताना डोंगळे यांनी त्यांचा या सभेशी काही संबंध नसल्याचे स्पष्ट केले.

काय होते महाडिकांचे प्रश्न ?

  • संपर्क सभांमध्ये संघाच्या कारभारामध्ये बचत केल्याचे सांगितले. पण अशी बचत अहवालात दिसत नाही. प्रत्यक्षात सर्वच खर्चात वाढ दिसते, याचे कारण काय ?

  • वाशी मुंबई शाखेत बाहेरून खरेदी केलेल्या दुधामध्ये वाढ दिसते. मुंबईच्या म्हैस दूध विक्रीत घट दिसते. बाहेरील दूध पूर्वीप्रमाणे सहकारी संस्थांकडून न घेता खासगी संस्थांकडून घेतले जाते. याचे कारण काय? तीनही गोष्टींचा खुलासा करावा.

  • पशुखाद्य कारखान्यात सोलर पॅनल बसवून कोट्यवधींची बचत केल्याचे सांगण्यात आले. पण अहवालात पशुखाद्य विभागाचा नफा फक्त एक लाख दिसतो. मग बचत केलेली रक्कम कुठे गेली ?

  • सन 2022-23 मध्ये संचालक खर्चासाठी 30 लाख रुपयांची मंजुरी असताना 49 लाख रुपये खर्च केले गेले. सदर खर्चाचा तपशील द्यावा.

  • जिल्ह्यातील दूध संकलन घटलेले असताना संकलन खर्चात वाढ कशी? प्रामुख्याने कोणत्या रूटला संकलन वाढ त्याची माहिती मिळावी.

Satej Patil, Shoumika Mahadik
Kolhapur Gokul Sabha: 'गोकुळ'ची सभा वादळी : मूळ सभासद गप्प; पण कार्यकर्त्यांचे आकांडतांडव
  • कोल्हापूर जिल्ह्यातील संस्थांकडून संकलित होणाऱ्या म्हैस व गाय दुधाची मागील तीन वर्षांची आकडेवारी मिळावी. इतर जिल्ह्यातील व परराज्यातील आकडेवारी देऊ नये. फक्त कोल्हापूर जिल्ह्यातील आकडेवारी द्यावी.

  • सन 2020-21 अखेर संघाच्या किती मुदतबंद ठेवी शिल्लक होत्या? आता 2023 अखेर किती शिल्लक आहेत ?

  • दूध संघाची वाढलेली उलाढाल ही केवळ दूध खरेदी-विक्री दरात वाफच केल्यामुळेच आहे का? आणि उलाढाल वाढूनही व्यापारी नफ्यात घट का ?

  • मागील झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर आजपर्यंत संस्थांना किती लिटर वासाचे दूध परत केले गेले, त्याची आकडेवारी मिळावी.

  • - संपर्क सभांमध्ये वाहतूक खर्चात बचत केल्याची माहिती मिळाली, पण प्रत्यक्ष अहवालात वाहतूक खर्चात वाढ झाल्याचे दिसते. त्यामुळे 2020-21 मध्ये वाहतूक ठेकेदारांना अदा केलेल्या बिलांची रक्कम व 2022-23 मध्ये अदा केलेली एकूण रक्कम याची तुलनात्मक माहिती मिळावी. खर्चात वाढ कशामुळे झाली, याचा खुलासा करावा.

(Edited by Sunil Dhumal)

Satej Patil, Shoumika Mahadik
Kolhapur Gokul Sabha News : 'गोकुळ'च्या सभेपूर्वीच गोंधळ; बॅरिकेड्स तुटले, घोषणाबाजी करत महाडिक गट आक्रमक..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in