पाटणकरांना धक्का; मोरगिरीत ६० वर्षांनी सत्तांतर, शंभूराज देसाई गटाची सत्ता

त्यामुळे बाळासाहेबांच्या शिवसेनेला Balasahebs Shivsena पाटण तालुक्यात Patan ही पहिली ग्रामपंचायत मिळाली आहे. राष्ट्रवादीसह NCP पाटणकर Patankar group गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.
Shambhuraj Desai, Vikramsinh Patankar
Shambhuraj Desai, Vikramsinh Patankarsarkarnama

पाटण : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांची साठ वर्षे सत्ता असलेल्या मोरगिरी ग्रामपंचायतीत उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या गटाने सत्ता मिळवत सत्तांतर घडविले आहे. सरपंच पदासह आठही जागा जिंकल्या आहेत.

सातारा जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतींच्या निवडणूका झाल्या. यामध्ये पाटण तालुक्यातील दोन, महाबळेश्वर तालुक्यातील एक, जावळी तालुक्याल एका ग्रामपंचायतीचा समावेश होता. यामध्ये राजकिय दृष्ट्या महत्वपूर्ण असलेल्या पाटण तालुक्यातील मोरगिरी ग्रामपंचायतीचा यामध्ये समावेश होता.

Shambhuraj Desai, Vikramsinh Patankar
Satara : शिंदे-फडणवीस सरकारने शंभर दिवसांत काढले ७०० जीआर... शंभूराज देसाई

मोरगिरी ग्रामपंचायतीवर स्थापनेपासून राष्ट्रवादीचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या गटाची सत्ता होती. यावेळेस माजी मंत्री पाटणकर व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या स्थानिक गटाच्या दोन पॅनेलमध्ये लढत झाली. यामध्ये सरपंच पदासह आठही जागा जिंकून मंत्री शंभूराज देसाई यांच्या गटाने सत्तांतर घडविले आहे.

Shambhuraj Desai, Vikramsinh Patankar
ऐतिहासिक राजवाड्याचा रूबाब कायम राहण्यासाठी तो आमच्या ताब्यात द्या... उदयनराजे

त्यामुळे बाळासाहेबांच्या शिवसेनेला पाटण तालुक्यात ही पहिली ग्रामपंचायत मिळाली आहे. राष्ट्रवादीसह पाटणकर गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. पाटण तालुक्यातील दुसऱ्या घाणव या ग्रामपंचायतीत मात्र पाटणकर गटाची सत्ता अबाधित राहिली आहे. घाणव ग्रामपंचायत : विजयी उमेदवार असे सरपंच- सविता आनंदा सुर्यवंशी, सदस्य- हेमलता दत्तात्रय देसाई.

Shambhuraj Desai, Vikramsinh Patankar
शिवसेनेच्या वाढलेल्या मताधिक्क्यानेच सत्यजितसिंह पाटणकरांचा थयथयाट...

मोरगिरी ग्रामपंचायत विजयी उमेदवार : सरपंच- अर्चना किरण गुरव, सदस्य- सचिन कृष्णाजी मोरे, सरिता कृष्णत कुंभार, वैशाली सचिन मोरे, संदीप गजानन सुतार, सुनिता सुरेश गुरव, जगन्नाथ परशराम माने व निर्मला रावसाहेब चव्हाण.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com