शिवसेनेने मारले कराडात सोमय्यांच्या पोस्टरला जोडे

सोमय्या Somayya यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा Crime of treason दाखल करून त्यांना तुरुंगात टाकावे Should be imprisoned, अशी मागणी शिवसेनेच्या Shivsena वतीने करण्यात आली.
शिवसेनेने मारले कराडात सोमय्यांच्या पोस्टरला जोडे
Shivsena agitationsarkarnama

कऱ्हाड : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना तुरुंगात टाकावे, या मागणीसाठी आणि शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या समर्थनार्थ शिवसेनेच्यावतीने आज कराड दत्त चौकात आंदोलन करण्यात आले. सोमय्या यांच्या प्रतिकात्मक पोस्टरवर 'जोडे मारो' आंदोलन केले.

भ्रष्ट सोमय्या हाय हाय..., निषेध असो निषेध असो.. किरीट सोमय्यांचा निषेध असो..., सोमय्या मुर्दाबाद अशा घोषांनांनी परिसर दणाणुन गेला. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख नितीन काशीद, कऱ्हाड शहर प्रमुख शशिकांत हापसे, ग्राहक कक्षाचे उपजिल्हा प्रमुख राजेंद्र माने, माजी नगरसेवक प्रमोद वेर्णेकर, अजित पुरोहीत, काकासाहेब जाधव, साजीद मुजावर, शेखर बर्गे, दिलीप यादव, सतीश पाटील, दक्षिण तालुका उपप्रमुख सुनिल पाटील, जिल्हा महिला संघटीका अनिता जाधव, विद्या शिंदे, मधुकर शेलार, शंभुराज रैनाक यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

Shivsena agitation
मोदी सरकार जाणीवपूर्वक मराठी भाषेकडे दुर्लक्ष करतेय; शिवसेना खासदार बारणेंचा आरोप

नितीन काशीद म्हणाले, ''भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आयएनएस विक्रांतच्या नावाखाली गोळा केलेल्या पैशांचा किरीट सोमय्या यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचे माहिती अधिकारातून उघडकीस आली आहे,'' असे सांगून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना तुरुंगात टाकावे, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी मागण्यांचे निवेदन वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांना देण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in