शिवसेना सातारा जिल्हा संपर्क प्रमुख संजय मोहिते यांचे निधन

विद्यमान नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde, शिवसेनेचे नेते दगडू सपकाळ Dagadu Sapkal यांचे ते कट्टर समर्थक होते.
Sanjay Mohite News, Sanjay Mohite passed away News Updates
Sanjay Mohite News, Sanjay Mohite passed away News Updates Sarkarnama

कराड : शिवसेनेचे सातारा जिल्ह्याचे संपर्क प्रमुख संजय मोहिते (वय 55) यांचे आज सकाळी कराड येथे ह्रदयविकाराने निधन झाले. दोनच महिन्यात शिवसेनेला हा दुसरा मोठा धक्का बसला आहे. मोहिते यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. (Sanjay Mohite passed away News Updates)

श्री. मोहिते यांना आज बुधवारी पहाटे अस्वस्थ वाटू लागल्याने कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सूरू असताना त्यांचे निधन झाले. संजय मोहिते हे शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणून प्रसिद्ध होते. सामाजिक प्रश्नासाठी त्यांनी अनेक वेळा शिवसेनेच्या माध्यमातून आंदोलने करून, मोर्चे काढून सर्वसामान्यांना न्याय मिळावा यासाठी पंचवीस वर्षाहून अधिक काळ प्रयत्न केले होते.

Sanjay Mohite News, Sanjay Mohite passed away News Updates
सातारा-जावळीत 'राष्ट्रवादी'चाच आमदार झाला पाहिजे....जयंत पाटील

त्यांनी शिवसेना प्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कराड दौऱ्याचेही मागील काही वर्षांपूर्वी नियोजन केले होते. शिवसेनेमध्ये त्यांनी आत्तापर्यंत विविध पदावर काम केले होते. विद्यमान नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेचे नेते दगडू सपकाळ यांचे ते कट्टर समर्थक होते. शिवसेनेचे चंद्रकांत पवार, अशोक भावके, उपजिल्हा प्रमुख रामभाऊ रैनाक यांच्या निधनानंतर काही दिवसातच संजय मोहिते यांचे निधन झाल्याने मोठी हळहळ व्यक्त होत आहे. एक शिवसेनेचा कट्टर कार्यकर्ता गमावल्याचे दुःख शिवसैनिकात आहे. मोहिते हे कोयना वसाहत येथे राहत होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी व मुले असा परिवार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com