शिवसेना पदाधिकाऱ्यांनी महामार्ग कामगारांना डांबले

शिवसेनेच्या ( Shivsena ) पदाधिकाऱ्यांनी नगर-दौंड महामार्गाचे काम अपुरे झाल्याचे सांगत महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या कामगारांना दोरखंडाने डांबून ठेवले.
Sandesh Karle
Sandesh KarleSarkarnama

अहमदनगर - अहमदनगर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांकडून आरोप-प्रत्यारोप व श्रेयवादाचे राजकारण सुरू झाले आहे. अशातच शिवसेनेच्या ( Shivsena ) पदाधिकाऱ्यांनी नगर-दौंड महामार्गाचे काम अपुरे झाल्याचे सांगत महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या कामगारांना दोरखंडाने डांबून ठेवले. ( Shiv Sena office bearers tied up the highway workers )

नगर-दौंड महामार्गाचे अपुरे काम अपघाताला निमंत्रण ठरत आहे. प्रवाशांना त्यामुळे जीव गमवावा लागत आहे. ठेकेदाराला सांगून तो ऐकत नसल्याचा आरोप करत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पॅचिंग कामास आलेल्या कर्मचाऱ्यांना अक्षरशः दोरखंडाने बांधून ठेवले. उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांच्या नेतृत्वाखाली खडकी (ता. नगर) येथे शिवसैनिकांनी ही भूमिका घेतली.

Sandesh Karle
सहकार विभागाची नगर तालुका बाजार समितीला ‘कारणे दाखवा’ नोटीस

नगर-दौंड महामार्गावर पॅच काढण्याचे काम चालू आहे. पॅच काढत असताना कुठलीही दक्षता संबंधित एजन्सी घेत नसल्यामुळे या राष्ट्रीय महामार्गावर गेल्या आठ दिवसांपासून अपघातांची मालिका सुरू आहे. आठ दिवसांत तीन जण दगावले आहेत. सहा जण गंभीर जखमी झाले, तसेच वाहनांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. याबाबत सुरक्षेच्या दृष्टीने, ज्या ठिकाणी काम चालू आहे, तेथे फलक लावण्यात यावेत, याबाबत जिल्हा परिषद संदेश कार्ले यांनी संबंधित विभागाला सूचना दिल्या होत्या. मात्र, याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले. काल गुरुवारी (ता. 10) रात्री खडकी येथे अपघात झाला. यामध्ये चारचाकी वाहनांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. दुचाकीस्वार जबर जखमी झाले. त्यांना खासगी रुग्णालयात हलविले.

Sandesh Karle
शिवसेना नेते एकनाथ शिंदेंचा भाजपला पुन्हा धक्का...

या सर्व प्रकरणाला महामार्गावरील अधिकारी कारणीभूत आहेत. आज शुक्रवारी दुपारी दोन वाजता शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख जिल्हा परिषद सदस्य कार्ले यांनी शिवसेना स्टाइल आंदोलन करीत कर्मचाऱ्यांना दोरखंडाने बांधून ठेवले. जोपर्यंत कंपनीचे अधिकारी येत नाहीत, तोपर्यंत बांधून ठेवणार. काम चालू असलेल्या ठिकाणी दोन्ही बाजूंनी रिफ्लेक्टर बसवावेत. अपघातात जखमी झालेल्या नागरिकांना रुग्णालयाचा खर्च, तसेच वाहनाची नुकसान भरपाई देऊन मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा त्याच वेळी कर्मचाऱ्यांना सोडू, असा पवित्रा यावेळी शिवसैनिकांनी घेतला होता.

आंदोलनाच्या वेळी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे कर्मचारी आंदोलनस्थळी आले. या आंदोलनास माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, सुरेश काटे, दत्ता पवार, राहुल निकम, राहुल कोठुळे, सचिन काळे, मंगेश शिंदे, किरण बहिरट, गिरीश भोपे, सुदाम रोडे, भाऊसाहेब बहिरट यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com