शिवसेनेचे खासदार पडले पिचडांच्या पाया आणि म्हणाले...

राजूर ( Rajur ) येथे आज खासदार सदाशिव लोखंडे ( MP Sadashiv Lokhande ) हे माजी मंत्री मधुकर पिचड ( Madhukar Pichad ) यांना भेटण्यासाठी आले होते.
Shiv Sena MP Sadashiv Lokhande laid the foundation of Madhukarrao Pichad
Shiv Sena MP Sadashiv Lokhande laid the foundation of Madhukarrao PichadSarkarnama

अकोले ( अहमदनगर ) : निळवंडे धरणाच्या चारीचा पाणी प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी मोठा निधी नुकताच मंजूर झाला. त्यानुसार कामेही सुरू झाली आहेत. त्यामुळे हा पाणी प्रश्न सुटण्याची चिन्हे आहेत. हा प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी केंद्र व राज्य सरकारांकडे पाठपुरावा केला होता. Shivsena MP fell at the feet of Pichad and said...

राजूर येथे आज खासदार लोखंडे हे माजी मंत्री मधुकर पिचड यांना भेटण्यासाठी आले होते. केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे सुद्धा राजूर येथे पिचड यांच्या निवासस्थानी येणार असल्याने त्यांच्याकडे सकाळपासूनच कार्यकर्त्यांची गर्दी होती. मंत्री येण्यापूर्वीच लोखंडे आल्याचे समजताच माजी मंत्री मधुकर पिचड यांनी लोखंडे यांचे स्वागत केले. या प्रसंगी खासदार लोखंडे यांनी पिचड यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. यावेळी खासदार यांच्या सोबत त्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Shiv Sena MP Sadashiv Lokhande laid the foundation of Madhukarrao Pichad
खासगी डॉक्‍टरांनी माणुसकी दाखवावी : खासदार सदाशिव लोखंडे

या प्रसंगी खासदार लोखंडे म्हणाले, शिर्डी लोकसभा खासदार म्हणून काम करताना निळवंडेसाठी निधी उपलब्ध करण्यासाठी सर्वांचेच मोलाचे मार्गदर्शन झाले. माजी मंत्री मधुकर पिचड यांचेही निळवंडे पुनर्वसनासाठी मोठे योगदान असल्याची कबुली खासदार सदाशिव लोखंडे यांनी राजूर येथे बोलताना दिली.

Shiv Sena MP Sadashiv Lokhande laid the foundation of Madhukarrao Pichad
मला या वयात रस्त्यावर उतरायला भाग पाडू नका - मधुकरराव पिचड

साहेब तब्येतीची काळजी घ्या यापुढेही मार्गदर्शन करा, असेही लोखंडे म्हणाले. यावर माजी मंत्री मधुकर पिचड यांनी मंत्री नितीन गडकरी यांच्या भाषणाचा धागा पकडून खासदार म्हणून तुमचे काम चांगले आहे. आमच्या तालुक्यातील धरणात व प्रकल्पात विस्थापित झालेल्या आदिवासी जमिनीवर 7/12 वर महाराष्ट्र शासन नाव लावून शेतकऱ्याला इतर हक्कात टाकणार असून आपण आमचा आवाज संसदेत पोहचवा, अशी मागणी पिचड यांनी लोखंडे यांच्याकडे केली.

विजय भांगरे यांनी भंडारदरा येथील विल्सन डॅमचे नाव बदलून क्रांतीवीर राघोजी भांगरे द्यावे याचेही निवेदन दिले त्यावर खासदार सदाशिव लोखंडे यांनी याबाबत मुख्यमंत्री व संबधित खात्याला पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. यावेळी पिचड यांचे दर्शन घेऊन ते पुन्हा शिर्डी कडे रवाना झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com